iraq

इराकमधील बेपत्ता भारतीयांचा शोध सुरु - सुषमा स्वराज

इराकमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांचा शोध सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली.

Nov 28, 2014, 06:59 PM IST

इसिसमध्ये गेलेले कल्याणचे ‘ते’ चौघं लवकरच परतणार?

इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघंही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ते केव्हाही भारतात परतू शकतात, यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांनीही तयारी चालवली असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली. भारतात परतल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळं परतल्यावर सुरक्षेबाबत ते साशंक असल्याचंही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 

Nov 26, 2014, 04:26 PM IST

काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय. 

Oct 13, 2014, 02:44 PM IST

अमेरिकेचा इसिसवर क्षेपणास्त्र हल्ला

isis (इसिस) या अतिरेकी संघनेविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचललीत. सीरियामध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला चढवला.

Sep 23, 2014, 12:53 PM IST

अमेरिकेचे इराकच्या 'इरबिल'वर बॉम्बहल्ले सुरू

अमेरिकेनं इराकमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांवर हवाई हल्ले सुरु केलेत. 

Aug 9, 2014, 11:51 AM IST

इराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज

इराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज

Aug 8, 2014, 02:31 PM IST

इराकच्या ISIS दहशतवाद्यांवर अमेरिका करणार हल्ला

दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ला करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची घोषणा. इराकमध्ये जे काही घडते आहे त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करु शकत नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं आहे.

Aug 8, 2014, 10:13 AM IST

कल्याण- ठाण्याचे युवक इराकच्या दहशतवादी संघटनेत?

इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत कल्याणचे चार युवक आणि ठाण्याचे चार युवक सहभागी झाल्याचं वृत्त आहे. कल्याणचे हे चार युवक इसिस या दहशतवादी संघटनेकडून इराक सरकारविरोधात लढत असल्याचं वृत्त आहे. 

Jul 14, 2014, 02:52 PM IST

इराकमध्ये अडकलेल्या सर्व नर्सेस कोच्चीत दाखल

 इराकमध्ये अडकलेल्या सर्व नर्सेस मायदेशी परतल्या आहेत. ४६ नर्सेस कोच्चीला दाखल झाल्या आहेत. इराकहून परतलेल्या या नर्सेसचं कोच्ची विमानतळावर स्वागत करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसह शेकडो नागरिक जमलेले होते.

Jul 5, 2014, 01:42 PM IST

इराकमध्ये बंधक ४६ नर्स, १३७ जण भारतात परतले

इराकमध्ये सुन्नी दहशतवादी संघटना ISISच्या ताब्यातून ४६ भारतीय नर्सची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे. ४६ नर्स आणि १३७ जणांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज सकाळी ९.३० वाजता मुंबईत आणले गेले. त्यानंतर त्यांना कोच्ची येथे विमानाने सोडण्यात येणार असून त्या दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहोचतील. दरम्यान, दहशतवादी संघनेने बिनाशर्त भारतीयांना सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 5, 2014, 10:47 AM IST

‘त्या’ 46 नर्सेसची सुटका; उद्या भारतात परतणार

इराकमध्ये चाललेल्या यादवी युद्धात गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या 46 भारतीय नर्सेसची अखेर सुटका करण्यात आलीय. 

Jul 4, 2014, 06:22 PM IST