इराकमध्ये बंधक ४६ नर्स, १३७ जण भारतात परतले

इराकमध्ये सुन्नी दहशतवादी संघटना ISISच्या ताब्यातून ४६ भारतीय नर्सची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे. ४६ नर्स आणि १३७ जणांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज सकाळी ९.३० वाजता मुंबईत आणले गेले. त्यानंतर त्यांना कोच्ची येथे विमानाने सोडण्यात येणार असून त्या दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहोचतील. दरम्यान, दहशतवादी संघनेने बिनाशर्त भारतीयांना सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

AP | Updated: Jul 5, 2014, 10:56 AM IST
इराकमध्ये बंधक ४६ नर्स, १३७ जण भारतात परतले title=

मुंबई, कोच्ची : इराकमध्ये सुन्नी दहशतवादी संघटना ISISच्या ताब्यातून ४६ भारतीय नर्सची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे. ४६ नर्स आणि १३७ जणांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज सकाळी ९.३० वाजता मुंबईत आणले गेले. त्यानंतर त्यांना कोच्ची येथे विमानाने सोडण्यात येणार असून त्या दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहोचतील. दरम्यान, दहशतवादी संघनेने बिनाशर्त भारतीयांना सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

इराकमध्ये सुन्नी दहशतवादी संघटना ISISच्या ताब्यातून ४६ भारतीय नर्सची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे. ४६ नर्स आणि १३७ जणांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज सकाळी ९.३० वाजता मुंबईत आणले गेले. त्यानंतर त्यांना कोच्ची येथे विमानाने सोडण्यात येणार असून त्या दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहोचतील. दरम्यान, दहशतवादी संघनेने बिनाशर्त भारतीयांना सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

इराकमध्ये चाललेल्या यादवी युद्धात गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या 46 भारतीय नर्सेसची अखेर सुटका करण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’नं बंदी बनविलेल्या या भारतीय नर्सेसची शुक्रवारी सोडवणूक करण्यात आलीय. यानंतर या नर्सेसना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवला गेलं होते.  

केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकमध्ये फसलेल्या 46 भारतीय नर्सेसची सुटका झालीय आणि शनिवारी त्या कोच्चीला दाखल होतील. त्यांच्या सुटकेविषयी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलीय, असंही त्यांनी म्हटलं होतं.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.