काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय. 

Updated: Oct 13, 2014, 02:44 PM IST
काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क title=

नवी दिल्ली: भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय. 

या रिपोर्टनुसार श्रीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी ईदच्या नमाजनंतर हिंसा भडकली, तेव्हा प्रदर्शनकर्त्यांनी इराकची दहशतवादी संघटना इसिस (ISIS)चे झेंडे झळकावले. नौहट्टा भागातमधील जामा मस्जिदमध्ये ईदची नमाज अदा केल्यानंतर भारताविरोधात स्लोगन लिहिलेले झेंडे दाखवले गेले आणि प्रदर्शन केलं गेल.
 
या घटनेनंतर सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. याबाबतीत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला असला तरी सुरक्षा संस्था हे झेंडे दाखवण्याऱ्या त्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये जवानांसमोर दाखवले गेलेल्या इसिसच्या झेंडे पाहून हे लक्षात येतंय की, काश्मीरात असा गट सध्या काम करतोय, जो इसिसच्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या दहशतवादी कारवायांना समर्थन करतायेत. ही घटना 6 ऑक्टोबरला ईदच्या दिवशी घडली. 

श्रीनगरला ईदगाह मैदानात ईदची नमाज झाल्यानंतर गाजा पट्टीमध्ये इज्रायली हल्लाविरोधात प्रदर्शन केलं गेलं. सुरक्षारक्षकांनी गर्दी थांबविण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही पक्षांदरम्यान दगडफेड सुरू झाली. जवानांनी प्रदर्शनकर्त्यांना घालवलं. यादरम्यान काही जणांनी इसिसचा झेंडे दाखवले. त्या युवकांनी आपले चेहरे रूमालानं झाकले होते. पण यामुळं गुप्तहेर संघटना खूप सतर्क झाल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.