कल्याण- ठाण्याचे युवक इराकच्या दहशतवादी संघटनेत?

इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत कल्याणचे चार युवक आणि ठाण्याचे चार युवक सहभागी झाल्याचं वृत्त आहे. कल्याणचे हे चार युवक इसिस या दहशतवादी संघटनेकडून इराक सरकारविरोधात लढत असल्याचं वृत्त आहे. 

Updated: Jul 14, 2014, 08:52 PM IST
कल्याण- ठाण्याचे युवक इराकच्या दहशतवादी संघटनेत? title=

कल्याण: इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत कल्याणचे चार युवक आणि ठाण्याचे चार युवक सहभागी झाल्याचं वृत्त आहे. कल्याणचे हे चार युवक इसिस या दहशतवादी संघटनेकडून इराक सरकारविरोधात लढत असल्याचं वृत्त आहे. 

कल्याणच्या या चार जणांची नावं आरीफ इजाज माजीद, सईम फारूक तानकी, फहाद तन्वीर मकबूल आणि अमन नईम तांडेल अशी आहे. यातले तिघं इंजिनिअरींगचे विद्यार्थी आहेत. तर एक जण बारावीचा विद्यार्थी आहेत. मे महिन्यात हे चौघंही कल्याणमधून बेपत्ता झालेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे या दिवशी इराकमधल्या एका धर्मस्थळाला भेट देण्यासाठी ते २२ जणांच्या गटातून रवाना झाले. त्यानंतर २५ मे या दिवशी त्यांनी फजौल्लाह या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी केली. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. विशेष म्हणजे या इराक ट्रीपविषयी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती दिली नव्हती. अरिफ माजीदचा फोन मोसूलमधल्या एका टॉवरशी कनेक्ट झाला पण त्यानंतर तो ट्रॅक झालेला नाही. मात्र अरीफच्या वडिलांनी केंद्र सरकारकडे मदत मागितलीय. 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज किंवा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट त्यांनी मागितलीय. आमच्या मुलांना ज्यांनी हा वेडेपणा करायला लावला अशा असामाजिक घटकांना तातडीनं कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्यावर्षी अलकायदाचा पाकिस्तानी दहशतवादी असिम उमरनं भारतीय मुसलमानांनी जागतिक जिहादमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे कल्याणमधल्या या चार विद्यार्थ्यांखेरीज मुळचे ठाण्यातले आणि सध्या युएईमध्ये राहणारे चौघेजणही इसिसमध्ये दाखल झाल्याचं वृत्त आहे. 

आरीफने त्याच्या मातापित्यांना लिहीलेल्या पत्रात काय म्हटलंय पाहा...

•    तुम्ही जी पापं करत आहात, ती पाहून मला रडायला येतं..

•    तुम्ही धुम्रपान करता, व्याज घेता, टीव्ही पाहता, अनैतिक संबंध ठेवता, तुमचं सुखासीन आयुष्य पाहून मला रडायला येतं

•    या गोष्टी तुम्हाला नरकात घेऊन जातील.. मला या पापी जगात थांबायचं नाही

•    मृत्यूनंतर मला विचारणा होईल की तू अल्लाच्या जमिनीवर का परतला नाहीस? 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.