home loans

पुण्यात ८० टक्के चालू बांधकामांची 'रेरा'कडे नोंदणी नाही!

शहरातील रेरा अंतर्गत तीन हजार बांधकामांची नोंदणी झाली आहे. पुणे , पिंपरी - चिंचवड आणि PMRDA च्या हद्दीतील ही बांधकामं आहेत. नोंदणी झालेल्या बांधकामाची संख्या सध्या सुरु असलेल्या बांधकामांच्या तुलनेत फक्त वीस टक्के आहे. जवळपास ऐंशी टक्के चालू बांधकामांची रेराकडे नोंदणी झाली नसल्याची माहिती पुढं येतेय. 

Aug 4, 2017, 12:59 PM IST

अंबरनाथामध्ये गृहकर्जाच्या नावाखाली २०० जणांची फसवणूक

गृहकर्जाच्या नावावर दोनशेहून अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक कण्यात आले आहे.  दरम्यान फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Mar 18, 2017, 09:36 AM IST

घर, गाडी कर्ज होणार स्वस्त, अर्थमंत्री जेटली यांचे संकेत

 येत्या काही दिवसांत किंवा आठवड्याभरात कर्जांवरील व्याजदर कमी केले जातील, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेत. बँक प्रमुखांशी जेटली यांनी चर्चा केली. त्यात कर्ज स्वस्त करुन ग्राहकांचा विश्वास कमावण्याचा आणि एनपीए करण्याचा मुद्दा चर्चिला गेला.

Jun 13, 2015, 11:18 AM IST

आरबीआयच्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ, घरे महागणार

रिझर्व्ह बँक आज आपला तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली. रेपो रेट आता ७.२५ टक्क्यावरुन ७.५० टक्के झाला आहे. त्यामुळे गृह, वाहनासह सर्वच प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. याचा फटका नविन घरे घेणाऱ्यांना बसणार आहे.

Sep 20, 2013, 12:38 PM IST

'देना' देत आहे

वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देना बँकेने नव्या वाहन कर्जांवर 0.25 पॉईंटची सवलत जाहीर केली आहे. तसंच प्रोसेसिंग फी निम्म्याने कमी केली आहे. देना बँकेची ही फेस्टिव्हल ऑफर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०११ पर्यंत लागु राहणार आहे. देना बँकेने नव्या गृह कर्ज आणि कारसाठी कर्जावरच्या व्याज दरात २५ बेसिस पॉईंटनी कपात केली आहे. तसंच ग्राहकांना नव्या कर्जावरच्या प्रोसेसिंग फी मध्ये सध्या आकारत असलेला एक टक्का दर निम्म्याने कमी केला आहे.

Nov 18, 2011, 11:55 AM IST