'देना' देत आहे

वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देना बँकेने नव्या वाहन कर्जांवर 0.25 पॉईंटची सवलत जाहीर केली आहे. तसंच प्रोसेसिंग फी निम्म्याने कमी केली आहे. देना बँकेची ही फेस्टिव्हल ऑफर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०११ पर्यंत लागु राहणार आहे. देना बँकेने नव्या गृह कर्ज आणि कारसाठी कर्जावरच्या व्याज दरात २५ बेसिस पॉईंटनी कपात केली आहे. तसंच ग्राहकांना नव्या कर्जावरच्या प्रोसेसिंग फी मध्ये सध्या आकारत असलेला एक टक्का दर निम्म्याने कमी केला आहे.

Updated: Nov 18, 2011, 11:55 AM IST

 झी २४ तास बेव टीम, मुंबई 

वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देना बँकेने नव्या वाहन कर्जांवर 0.25 पॉईंटची सवलत जाहीर केली आहे. तसंच प्रोसेसिंग फी निम्म्याने कमी केली आहे. देना बँकेची ही फेस्टिव्हल ऑफर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०११ पर्यंत लागु राहणार आहे. देना बँकेने नव्या गृह कर्ज आणि कारसाठी कर्जावरच्या व्याज दरात २५ बेसिस पॉईंटनी कपात केली आहे. तसंच ग्राहकांना नव्या कर्जावरच्या प्रोसेसिंग फी मध्ये सध्या आकारत असलेला एक टक्का दर निम्म्याने कमी केला आहे.

सध्या देना बँकेचा बेस रेट १०.७० टक्के इतका आहे. तसंच गृह कर्जासाठी फ्लोटिंग रेट ११.२० ते १२.७५ टक्के इतका आहे आणि फिक्स लोन रेट ११.५० ते १२.७५ टक्के आकारण्यात येतो. वाहन कर्जासाठी तीन वर्षांपर्यंत १३.२५ टक्के व्याज दर आहे आणि तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीकरता १३.७५ टक्के दर आकारण्यात येतो. या व्याज दरात मध्ये ०.२५ बेसिस पॉईंटचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.