Weekly Tarot Horoscope Prediction 20 to 26 may 2024 in Marathi : आपल्याला प्रत्येकाला जाणून घ्यायच असतं की येणारा आठवडा हा आपल्यासाठी कसा असेल. मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात वृषभ राशीत गुरु आणि शुक्राची युती होणार आहे. यातून गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. अशात हा योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. एकंदरीत हा आठवडा कोणासाठी काय घेऊन आला आहे जाणून साप्ताहिक टॅरो कार्डनुसार मेष ते मीन राशीच्या लोकांचे भविष्य टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 20 to 26 may 2024 saptahik rashi bhavishya in marathi)
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. तुमचं विशेष कौतुक होणार आहे. त्याशिवाय या आठवड्यात तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्ही समाधानी असणार आहात. आरोग्याची पूर्ण काळजी घेणे फायद्याच ठरेल. तर कौटुंबिक वातावरण आनंददायी असणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी काही वस्तू खरेदी करणार आहात. या आठवड्यात तुम्ही नवीन लाभदायक लोकांशी संबंध प्रस्थापित करणार आहात. तसंच आज तुम्ही आरामात काम करण्यावर भर देणार आहात. अभ्यासासाठी वेळ उत्तम असणार असून शिक्षणातील अडथळे दूर होणार आहेत.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला सिद्ध होणार आहे. तुमचे रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. या आठवड्यात मालमत्तेबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. सहलीला जाण्यापूर्वी घरात योग्य सुरक्षा व्यवस्था करणे हिताच ठरेल. कुटुंबातील कोणाशी वाद होण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा चांगला असणार आहे. मंगळामुळे तुमचे आरोग्य आणि चैतन्य चांगले असणार आहे. तसंच गुरू ग्रहामुळे या आठवड्यात वाहन किंवा जमीन इत्यादी खरेदीचा आनंद तुम्ही घेणार आहात. आठव्या भावात शनि असल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागणार आहे. बाराव्या भावात सूर्य आणि बुध यांच्या भ्रमणामुळे खर्चात वाढ होणार आहे.
टॅरो कार्ड्सची गणनेनुसार सिंह राशीच्या लोकांना या क्षणी त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवाव लागणार आहे. नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी फारसा चांगला नसणार आहे. त्यामुळे या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरदार लोकांना इच्छित पदोन्नती मिळणार आहे. बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही विशेष लाभ आणि नवीन संधी मिळणार आहे. प्रियजनांच्या संपर्कात तुम्ही राहणार आहात. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि जवळीक अनुभवणार आहात. लोकांचे परस्पर सहकार्यही तुम्हाला मिळणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्ड्सनुसार प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. तसंच कामात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. परिणाम हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होणार आहे. उच्च अधिकारी तुमची क्षमता किंवा प्रतिभा तपासणार आहे.
टॅरो कार्ड्सची गणना ही वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्यादृष्टीने चांगला नसणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असणार आहे. तुमचे मन अस्वस्थ असल्यास थोडेसे ध्यान केल्यास फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने जीवनात आनंद येणार आहे.
हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी सहकार्य आणि अनुकूलता आणणारा असणार आहे. तसंच तुमचे नवीन संबंध फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या आर्थिक योजनांची योग्य अंमलबजावणी होणार आहे. नवीन काम मिळण्याची शक्यता वाढणार आहे. वाहनामुळे इजा होण्याची शक्यता आहे. मुलांकडून मदत मिळणार आहे.
टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या मागील प्रयत्नांचा लाभ मिळणार आहे. आठव्या भावात सूर्य गोचरामुळे तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवणार आहे. आरोग्यातही चढ उतार दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सूर्याला नमस्कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
या राशीचे लोक जे व्यवसायाशी संबंधित आहे त्यासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. टॅरो कार्ड्सचे गणितानुसार व्यवसायातील नवीन योजना तुम्हाला लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अनियमितता ही तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कामाच्या ठिकाणी अडथळे येण्याची शक्यता आहे. योजनेनुसार कामं न होण्यामुळे तुम्ही उदास असणार आहात.
टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. या आठवड्यात विरुद्ध लिंगाचा कोणता जोडीदार तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधींमध्येही तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक बाबतीत सावध राहणे तुमच्या हिताच होईल. गुरुवारी उपवास केल्यास तुम्हाला शांती मिळेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)