न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रॅंट एलियॉटने मागितली माफी
सेमीफाइनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात महत्वाचं योगदान करणारा ग्रॅंट एलियॉटने माफी मागितली आहे. सातव्यांदा सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहचवण्यात एलियॉटची 73 चेंडूत 84 धावांची खेळी महत्वाची ठरली होती.
Mar 25, 2015, 02:19 PM ISTदक्षिण आफ्रिकेचा तो खेळाडू खेळणार फायनलमध्ये
ऑकलंड : वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेला निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला होता. त्यासोबतच दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कपच्या फायनलमधे जाण्याचं स्वप्नही भंगलं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू फायनलमध्ये खेळणार आहे.
Mar 25, 2015, 12:25 PM ISTआफ्रिकेला ४ विकेटनं हरवून न्यूझीलंड फायनलमध्ये
ग्रँट एलियट नॉटआऊट ८४ रन्सच्या शानदार बॅटिंगमुळं न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेट आणि १ बॉल राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दमदारपणे वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारलीय. हाता - तोडांशी आलेली मॅच अशी गमावल्यानं दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.
Mar 24, 2015, 04:44 PM IST