न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रॅंट एलियॉटने मागितली माफी

सेमीफाइनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात महत्वाचं योगदान करणारा ग्रॅंट एलियॉटने माफी मागितली आहे. सातव्यांदा सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहचवण्यात एलियॉटची 73 चेंडूत 84 धावांची खेळी महत्वाची ठरली होती.

Updated: Mar 25, 2015, 02:19 PM IST
न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रॅंट एलियॉटने मागितली माफी title=

ऑकलंड : सेमीफाइनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात महत्वाचं योगदान करणारा ग्रॅंट एलियॉटने माफी मागितली आहे. सातव्यांदा सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहचवण्यात एलियॉटची 73 चेंडूत 84 धावांची खेळी महत्वाची ठरली होती.

एलियॉटने त्याच्या बहिणीची माफी मागितली आहे. कारण एलियॉटच्या घरी त्याच्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु आहे, असे असतांना तो मात्र वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहे. भविष्यात जेव्हा मी मागे वळून पाहिल तेव्हा या गोष्टी मला फार आठवतील, असे एलियॉट म्हणाला.

मी माझ्या बहिणीच्या लग्नाला जाऊ शकणार नाही, याचे मला खूप वाईट वाटत आहे. त्याबद्दल मी तिची माफी मागतो, असेही तो म्हणाला.

एलियॉटला मिळालेला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार त्याने देशवासियांना समर्पित केला. आमचा हा विजय टीमचा नसून उपस्थित असलेल्या प्रत्येस व्यक्तीचा आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या समर्थनाबद्दल त्याने आभार व्यक्त केले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.