दक्षिण आफ्रिकेचा तो खेळाडू खेळणार फायनलमध्ये

Updated: Mar 25, 2015, 12:26 PM IST

ऑकलंड : वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेला निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला होता. त्यासोबतच दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कपच्या फायनलमधे जाण्याचं स्वप्नही भंगलं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू फायनलमध्ये खेळणार आहे.

सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला ग्रॅंड एलियॉट हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. त्याचा जन्म २१ मार्च १९७९ साली दक्षिण आफ्रिकेतील एका सर्जनच्या घरात झाला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेतील कोटा सिस्टिमने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अडथळा निर्माण केला होता. त्यानंतर क्रिकेटवेड्या ग्रॅंटने थेट न्यूझीलंडचा रस्ता धरला, आणि तेथे यशही संपादन केले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.