giriraj singh

मोदींनी फटकारल्यानंतर तो खासदार 'ढसाढसा' रडला

 काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर करण्यात आलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखिल सहन झालेले नाही. कारण भाजपचे खासदार गिरीराजसिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असं काही फटकारलं की, गिरीराजसिंह हे ढसाढसा रडले. 

Apr 21, 2015, 01:25 PM IST

'सोनियांचा वर्ण गोरा नसता तर स्वीकारले असते?'

भाजपचे खासदार गिरीराजसिंह यांनी  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधींचा रंग गोरा नसता तर काँग्रेसने त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Apr 1, 2015, 04:19 PM IST

भाजप नेते गिरीराज सिंह यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशामध्ये अनेक लोक मोदींना रोखण्याचा प्रयत्न करत असून अशा व्यक्तींचा राजकीय मक्का-मदिना पाकिस्तानात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

May 14, 2014, 12:12 PM IST

गिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.

Apr 22, 2014, 10:34 PM IST

'मोदींकडूनच होईल नितीश कुमारांची हत्या'

भाजप नेते गिरिराज सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची हत्या होईल, असं वक्तव्य करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.

Dec 24, 2013, 04:21 PM IST