परदेशातून आलेल्या या महिलेने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आपल्या आयटम साँगवरील डान्सच्या जोरावर ही अभिनेत्री जगभरात लोकप्रिय आहे. पण आज ही अभिनेत्री सुपरस्टारची सावत्र आई आहे. एवढंच नव्हे तर बॉलिवू़डवर आज राज्य करत आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनय आणि इमोशन्स नसतानाही या अभिनेत्रीने 600 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं.
पण या अभिनेत्रीने हिंदी सिनेमातील दिग्गज विवाहित अभिनेकतासोबत काम केलं आहे. ज्यानंतर ही अभिनेत्री आता 1000 कोटी रुपयांची मालकिन बनली आहे. सलीम खान यांची नेटवर्थ 1000 कोटी रुपये आहे. एकेकाळी या अभिनेत्रीच्या गाण्यावर संपूर्ण दुनिया नाचत होती. आजही बॉलिवूडमध्ये आयटम साँगचा उल्लेख केला तरी देखील या अभिनेत्रीचा उल्लेख केला जातो.
ही व्यक्ती आहे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची सावत्र आई आणि अभिनेत्री हेलन. ज्यांनी 21 नोव्हेंबर रोजी 86 वा वाढदिवस साजरा केला. हेलन या हिंदी सिनेमातील पहिल्या आयटम साँग गर्ल म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हेलन यांना 'मोनिका ओ माय डार्लिंग' आणि 'हम काले है तो क्या हुआ दिलवाल है' सारख्या गाण्यासोबत लोकप्रियता मिळवली आहे.
हेलेन म्यांमारच्या बर्मामध्ये राहत असून भारतात येऊन हिंदी सिनेमात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. वाचून थक्क व्हाल पण अभिनेत्रीने आतापर्यंत 600 सिनेमांत काम केलं आहे.
आवारा (1951), शबिस्तान (1951), मयूरपंख (1954), चलती का नाम गाडी (1958), गुमनाम (1965), शोले (1975), अमर अकबर अँथनी (1977), डॉन (1978), खामोशी (1996), हम दिल दे चुके सनम (1999), मोहब्बतें (2000), हमको दीवाना कर गये (2006), हिरोईन (2012) आणि ती अखेरची पगली शादी गो दादी (2021) या चित्रपटात दिसली होती. याशिवाय हेलनने दक्षिण आणि प्रादेशिक सिनेमांमध्येही आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे.
हेलनचे पहिले लग्न (1957-1974) चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक प्रेम नारायण अरोरासोबत झाले होते. त्याचवेळी, पहिल्या लग्नानंतर सात वर्षांनी हेलनने 1981 मध्ये सलमान खानचे विवाहित वडील सलीम खान यांच्याशी लग्न केले. सलीम खान यांनी हेलनशी लग्न करण्यासाठी त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक (सलमा खान) यांच्याकडून परवानगी घेतली होती. सलीम आणि हेलन यांना त्यांच्या लग्नापासून मूलबाळ झाले नाही आणि या जोडप्याने अर्पिता खानला दत्तक घेतले.