वाढता वाढता वाढे... इंधनाची दरवाढ
महागाईनं हैराण झालेल्या सर्वसामान्यांना कर रचनेतील बदलामुळं आणखी एक दणका बसलाय. राज्यांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ झालीय. महाराष्ट्रासह सात राज्यांतील जनतेला ही दरवाढ सोसावी लागणार आहे.
Jul 25, 2012, 01:53 PM ISTमनसेचा आरोप, एस.टी. डेपोच्या डिझेलमध्ये भेसळ
एस. टी. महामंडळाच्या लातूर डेपोमध्ये डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय. मनसे कार्यकर्त्यांनी डेपोतील डिझेल पंपावर धाड टाकत पंपातील डिझेल पुरवठा अधिका-यांच्या समक्ष तपासलं.
Jun 13, 2012, 08:44 AM ISTउपकार झाले, गॅस, डिझेलचे भाव नाही वाढले
केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री जयपाल रेड्डी यांनी नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. तूर्तास डिझेल आणि गॅसची दरवाढ होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच केरोसिनचे दरही वाढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
May 28, 2012, 05:13 PM ISTडिझेल-एलपीजीमध्येही भाववाढ होणार?
पेट्रोलचा धक्का कमी की काय पण त्यापाठोपाठ आता डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीही महागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिगटाची याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत सबसिडी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
May 23, 2012, 09:55 PM ISTपेट्रोल पुन्हा भडकणार?
२२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
May 17, 2012, 01:29 PM ISTपेट्रोल-डिझेल दरवाढीचे पीएमकडून संकेत
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते, भविष्यात महागाई कमी होईल. मात्र, या महागाईत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत देऊन भडका उडविण्याचा चंग बांधलेला दिसून आला. मुखर्जी यांनीही पेट्रोलचे दर वाढण्याची भाषा केली होती. त्यामुळे पुन्हा महागाई डोकेवर काढण्याची नांदी दिली गेली आहे.
Mar 16, 2012, 04:09 PM ISTपेट्रोल, डिझेल पुन्हा भडकणार?
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलचे वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही काळात पेट्रोल लिटरमागे चार तर डिझेलमध्ये दोन रुपयांनी पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Feb 27, 2012, 06:05 PM IST