पेट्रोल पुन्हा भडकणार?

२२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated: May 17, 2012, 01:29 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

महागाईच्या वणव्यात सामान्य जनता आणखी भरडली जाणार आहे. २२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पुन्हा भडका उडण्याची चिन्हे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, २२मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, २२ मे नंतर पेट्रोलमध्ये ५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलमध्ये ३ रुपये प्रति लिटर अशी वाढ होणार आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनीअधिवेशन संपण्याच्या अगोदरच पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली तर संसदेच्या कामकाजावर त्याचा प्रभाव पडू शकतो, त्यामुळे २२ मे नंतर तेलकंपन्यांची बैठक होऊन त्यामध्ये किंमती वाढविण्याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.

 

इंधनाच्या किंमतीबाबत तातडीनं निर्णय घेतला नाही तर संकटकालीन परिस्थिती येईल असा इशारा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिल्यानं ही वाढ अटळ मानली जातेय. अर्थमंत्र्यांनी कटू निर्णय घेण्याचे सुतोवाच केल्यानं आता ही वाढ अपरिहार्य मानली जातेय.