comment

हवामान खात्याचा अंदाज आणि अजित पवार

हवामान खात्यानं येत्या 2 दिवसांत राज्यभरात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये आजपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. 

Jul 15, 2014, 06:44 PM IST

राणेंविरोधात भूमिका घेणाऱ्या सावंत यांना पक्षाची नोटीस

उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आमदार विजय सावंत यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. राणेंविरोधातील भूमिकेबाबत तात्काळ खंडन करा आणि कामाला लागा अन्यथा कारवाई केली जाईल, असे दिलेल्या नोटीसमध्ये इशारा देण्यात आला आहे.

Apr 11, 2014, 06:23 PM IST

मुंडे भाजपची 'गोमु' - आर आर पाटील

भाजपमधील लोकांना आपली नावं बदलण्याची सवयच आहे. नमो म्हणजे नरेंद्र मोदी तर गोमु म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटलांनी केलीय.

Apr 9, 2014, 10:36 PM IST

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचाच राणेंवर हल्लाबोल

काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनीही `घरचा आहेर` दिल्यानं उद्योगमंत्री नारायण राणेंची डोकेदुखी आणखी वाढलीय. राणेंनी सिंधुदुर्गातली काँग्रेस संपवली. आता जी अस्तित्वात आहे ती राणे समर्थक काँग्रेस आहे, असा तिखट हल्ला सावंत यांनी चढवलाय.

Apr 9, 2014, 06:57 PM IST

फेसबुकवर अश्लील कॉमेंट केल्याने जेलची हवा

अन्न, वस्त्र, निवारा या एकेकाळच्या मुलभूत गरजा होत्या. आज त्यांचीच जागा मोबाईल, फेसबुक आणि व्हॉटसअपनं घेतलीय.

Mar 2, 2014, 06:56 PM IST

महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात

काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.

Feb 23, 2014, 11:02 PM IST

राज आणि उद्धवची “अळीमिळी, गुपचिळी”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बहुधा अलिखित करार झालाय की काय अशी शंका येऊ लागलीय. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोघे ठाकरे चुलत बंधू सध्या एकमेकांविरूद्ध टीका करणं टाळत असल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

Oct 14, 2013, 08:51 PM IST

अजित पवारांनी तोंड उघडले आणि मीडियाला हात जोडले!

ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वादग्रस्त विधानाने अचणीत आले होते. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मी जपून विधान करीन असे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनी तोंड उघडले. त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले. तर दुसऱ्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क मीडिया चांगली बातमी दाखविण्याचं आवाहन करताना चक्क हात जोडलेत.

Jun 13, 2013, 06:44 PM IST

`मन्या सुर्वे` फेसबुकवरही त्याचीच चर्चा...

‘शूट आऊट ऍट वडाला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे आणि ‘मन्या सुर्वे’ पुन्हा एकदा चर्चेत आला. मन्या सुर्वे हा महाराष्ट्रातील पहिला एन्कांऊटर झालेला गुंड आहे.

May 9, 2013, 01:49 PM IST

अजित पवार रिकाम्या बाकांकडे बघून खाली बसले!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत सर्वपक्षीय बहिष्कार सुरूच आहे. विरोधकांनी ‘क्लेश’ आंदोलन सुरू केले आहे. ज्यावेळी अजित पवार बोलायला उभे राहिले त्यावेळी विरोधी आमदारांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे सभागृहातील विरोधी बाके अचानकपणे रिकामी झालीत. या रिकाम्या बाकांकडे बघून अजित पवार खाली बसलेत.

Apr 17, 2013, 12:36 PM IST

दादांच्या पाठिशी सुप्रियाताई

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेताल व्यक्तव्य केल्यानंतर माफी मागितली. अजितदादांनी चौथ्यांदा माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे `त्या` वक्तव्याच्या विषयावर पडदा पडला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

Apr 9, 2013, 03:29 PM IST

पोलिसांची बनविली ढोलकी

सामाजिक सलोखा राखण्याचा विडा काँग्रेस आघाडी सरकारने घेतलेला आहे. खरंच सलोखा राखला जात आहे की बिघडवला जात आहे? याचे उत्तर लोकांच्या संतापातून मिळते. ते म्हणजे, म्हणे कायद्याचे राज्य आहे.

Nov 28, 2012, 06:23 PM IST

फेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद

शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला सुरुवात झालीये. सकाळपासून बाजारपेठेतली दुकानं उघडलेली नाहीत. शहरातली रिक्षा आणि इतर खासगी वाहतूक पूर्णपणं बंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यानं शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. पोलिसांचा क़डेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Nov 28, 2012, 10:16 AM IST

स्मारकासाठी कायदाही हातात घ्या - मनोहर जोशी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं..अशा प्रसंगी कायदा विरोधात असेल तर कायदा हातात घेण्याचं आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलंय.

Nov 25, 2012, 04:49 PM IST