शिवाजी महाराजांच्या नावाने खंडणी मागण्याचे काम - फडणवीस

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आम्ही शिवसेनेवर कोणतीही टीका करणार नाही, असे सांगणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष घणाघात चढवला. शिवाजी महाराजांच्या नावावर खंडणी मागण्याचे कोणी काम केले आहे ते पाहा, असे फडणवीस म्हणालेत.

Updated: Oct 4, 2014, 11:04 PM IST
शिवाजी महाराजांच्या नावाने खंडणी मागण्याचे काम - फडणवीस title=

मुंबई : शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आम्ही शिवसेनेवर कोणतीही टीका करणार नाही, असे सांगणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष घणाघात चढवला. शिवाजी महाराजांच्या नावावर खंडणी मागण्याचे कोणी काम केले आहे ते पाहा, असे फडणवीस म्हणालेत.

छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ....असा नारा भाजपनं दिला तर इतरांच्या पोटात का दुखू लागलं? असा टोला फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला लगावलाय.

शिवछत्रपती कुणाची खासगी संपत्ती नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. शिवाजी महाराज कोणाचीही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. छत्रपती हे सर्वांचे, रयतेचे राजे होते. शिवजयंती साजरी करताना आम्ही कोणाकडून खंडणी गोळा करीत नाही. तसेच आम्ही जगाला ओरडून सांगत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेवर चढवला.

मुंबई तोडण्याचा केवळ अपप्रचार केला जात आहे, तो चुकीचा आहे. काँग्रेसच्या काळात बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र पहिला आहे, असे देवेंद्र फडवणीस यावेळी म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.