bsp

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालाय. 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी हे मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात एकूण 608 उमेदवारांचं भवितव्य ठरणार असून त्यापैकी 24 उमेदवार हे अमेठीतले आहेत.  

Feb 27, 2017, 09:35 AM IST

पंतप्रधान मोदींची युपीत महारॅली, सपा, बसपा, काँग्रेसवर टीका

समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.

Jan 2, 2017, 04:32 PM IST

'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती

बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.

Dec 27, 2016, 12:26 PM IST

बसपाच्या खात्यात 104 कोटी, मायावती आणि त्यांचा भाऊ अडचणीत

उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार चांगलाच अडचणीत आलाय. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झाले आहे.

Dec 27, 2016, 07:54 AM IST

नोटबंदीचा निषेध करणार १३ पक्ष आणि २०० खासदार

 नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी संसदेतील तेरा पक्ष आणि जवळपास दोनशे खासदार संसद भवन परिसरात एकत्र जमणार आहेत. सर्वपक्षीय निषेध आंदोलनात याआधी कधीही सामील न झालेल्या बसपा अध्यक्षा मायावतीसुद्धा सहभागी होतील.

Nov 23, 2016, 09:44 AM IST

उत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.

Oct 13, 2016, 05:08 PM IST

सर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती

बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.

Oct 9, 2016, 06:56 PM IST

महाराष्ट्रात जे केले तेच केलं भाजपने युपीत

 उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. आता भाजपने महाराष्ट्रात जी रणनिती अवलंबली तशी रणनिती उत्तरप्रदेशात अवलंबत आहे. 

Aug 11, 2016, 03:18 PM IST

'फॉर्च्युनर' गाडीसाठी खासदाराच्या सुनेची हत्या?

बहुजन समाजवादी पार्टीचा खासदार नरेंद्र कश्यप, त्यांची पत्नी आणि मुलगा सागर कश्यप यांना गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी सुनेच्या हत्येप्रकरणात अटक केलीय. 

Apr 7, 2016, 12:17 PM IST

नागपूर उत्तर : काँग्रेस-भाजप-बसपमध्ये लढत

काँग्रेस-भाजप-बसपमध्ये लढत

Oct 6, 2014, 08:51 PM IST

बाळासाहेबांनंतर उद्धवने शिवसेना समर्थपणे सांभाळली - भुजबळ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपेल असं, मी कधीच म्हटलं नाही... उद्धव ठाकरेंमध्ये मॅनेजमेंटचे उत्तम गूण असून बाळासाहेबांनंतर उद्धवनं शिवसेना अतिशय आत्मविश्वासानं आणि समर्थपणे सांभाळली असल्याचं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे माजी नेते छगन भुजबळ यांनी मांडलंय. 

Oct 3, 2014, 07:41 PM IST

भाजपमध्ये बहुजनांना स्थान नाही - भुजबळ

भाजपच्या निर्णय प्रक्रियेत बहुजनांना स्थान नाही, असा घणाघती आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर केला आहे. 'झी २४तास'च्या रोखठोक कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

Oct 3, 2014, 07:19 PM IST

महाराष्ट्रात... हाथी चले अपनी चाल!

गेल्या काही निवडणुकांमधल्या निकालावरुन विदर्भात बहुजन समाज पक्षाचा प्रभाव वाढत चालल्याचं दिसून येतंय..गेल्या दोन लोकसभांच्या निकालावरुन तर यंदाच्या विधानसभेत बसपाची भूमिका निर्णायक ठरु शकते.

Oct 1, 2014, 09:48 AM IST