भाजपमध्ये बहुजनांना स्थान नाही - भुजबळ

भाजपच्या निर्णय प्रक्रियेत बहुजनांना स्थान नाही, असा घणाघती आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर केला आहे. 'झी २४तास'च्या रोखठोक कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

Updated: Oct 3, 2014, 07:55 PM IST
भाजपमध्ये बहुजनांना स्थान नाही - भुजबळ title=

मुंबई : भाजपच्या निर्णय प्रक्रियेत बहुजनांना स्थान नाही, असा घणाघती आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर केला आहे. 'झी २४तास'च्या रोखठोक कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

राज्यात नरेंद्र मोदी यांची काहीही लाट नाही. सातत्याने मीडियातून मोदी लाट, मोदी लाट हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांच्या मनावर ते बिंबवले गेले. लोकसभेसारखी आता परिस्थिती नाही. राज्यात प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे. राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल. राष्ट्रवादीमध्ये बहुजनांना स्थान देण्यात आले आहे. अनेक मंत्री हे राष्ट्रवादीने दिले आहेत. मात्र, भाजपमध्ये निर्णय प्रक्रियेत बहुजनांना स्थान नाही. भाजप बहुजनांना स्थान देत नाही हेच दिसत आहे, असे भुजबळ म्हणालेत.

बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी समर्थपणे, नेटाने शिवसेना सांभाळलीय आहे. आत्मविश्वासानं शिवसेना सांभाळत आहेत, असं भुजबळांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. शिवसेनेला चांगले दिवस आहेत, अशी माहिती भुजबळ यांनी दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. उद्धव ठाकरे चांगला पक्ष चालविला आहे. एवढ्या मोठ्या पक्षाला चालविणे तेवढे शक्य नाही. ते जास्त मेहनत घेत आहेत. बाळासाहेबानंतर ते अधिक मेहनत घेत आहेत. त्यांना चांगले यश मिळले, असे भुजबळ म्हणालेत.

दोन भाऊ एकत्र यावेत का, असे विचारले असता ते म्हणालेत तसे वाटते. मात्र, तो त्यांचा प्रश्न आहे. मी अधिक काहीही बोलणार नाही. मी काही सांगितले तर उद्या म्हटले जाईल, तुम्ही आम्हाल सल्ला देणार कोण? तेव्हा याबाबत गप्प राहिले बरे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.