brijbhushan singh

'2024 मध्ये कोण कापणार माझं तिकीट? नाव तर...'; 'त्या' प्रश्नावरुन चिडले बृजभूषण! मोदींचाही केला उल्लेख

Brijbhushan Singh Lok Sabha Election 2024 Ticket: महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे मागील अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपाच्या या खासदाराने पत्रकारांना उलटा प्रश्न विचारला आहे.

Sep 25, 2023, 10:50 AM IST

महिला कुस्तीपटूवर 6 ठिकाणी लैंगिक अत्याचार, बृजभूषण सिंह यांच्याविरोधात 17 लोकांची साक्ष; चार्जशीटमधून मोठा खुलासा

Brijbhushan Singh Sexual Assault: दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल केलं आहे. दरम्यान, 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार चार्जशीटमध्ये साक्षीदारांचा उल्लेख आहे. तसंच कुस्तीपटूंनी पोलिसांना दिलेला फोटोही त्यांच्या हाती लागला आहे. 

 

Jul 11, 2023, 07:17 PM IST

अल्पवयीन तरुणी कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, दिल्ली पोलिसांकडून चार्जशीट दाखल

Clean Chit to Brijbhushan Singh: सात महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची (Sexual Assualt) तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. पहिलं प्रकरण 6 महिला कुस्तीगिरांच्या तक्रारीच्या आधारावर होतं. तर दुसऱ्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीने तक्रार केली होती. 

 

Jun 15, 2023, 01:16 PM IST

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबतची महत्त्वाची अपडेट, 15 जूनपर्यंत...

Wrestlers protest Update :  क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची बैठक झाली. या बैठकीत बृजभूषण सिंह यांच्यावर 15 जूनपर्यंत थेट कारवाईचे आश्वासन सरकारने दिले आहे. हे आंदोलनाला मोठे यश आले आहे. जर ही कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 8, 2023, 07:36 AM IST

Wrestlers Protest: कुस्तीगिरांच्या आंदोलनाला मोठं यश, केंद्राचं चर्चेसाठी निमंत्रण, म्हणाले "हे सरकार..."

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना (Wrestlers) केंद्र सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. कुस्तीगिरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर लगेचच केंद्राने त्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. 

 

Jun 7, 2023, 07:15 AM IST

Wrestlers Protest: "ब्रिटिशांप्रमाणे हे सरकारही...," आंदोलनात मुलींवर होणारे अत्याचार पाहून महावीर फोगाट संतापले

Mahavir Phogat on Wrestlers Protest: देशातील जनता ब्रिटिशांप्रमाणे या सरकारलाही घालवेल असा इशारा माजी कुस्तीगीर महावीर फोगाट (Mahavir Phogat) दिला आहे. महिला कुस्तीगिरांना मिळणारी वागणूक पाहता, त्या खेळ सोडू देतील असंही ते म्हणाले आहेत. कनिष्ठ खेळाडूंचे भविष्य अंधकारमय होते असंही ते म्हणाले आहेत. 

 

Jun 1, 2023, 06:39 PM IST

"मला खूप वाईट वाटतंय, यापेक्षा....", भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर नीरज चोप्रा संतापला

Neeraj Chopra on Wrestlers Protest: दिल्लीत जंतर मंतरवर (Jantar Mantar) बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आज पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या दिशेने शांततापूर्ण मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. यानंतर त्यांनी कुस्तापटूंना अक्षरश: फरफटत नेलं. 

 

May 28, 2023, 07:35 PM IST

दिल्ली पोलिसांकडून आंदोलक पैलवानांवर कारवाई; जंतर-मंतरवरील तंबू उखडले; रस्त्यावर कोसळल्या फोगाट बहिणी

Delhi Police Action on Wrestlers: दिल्लीतील जंतर मंतरवर (Jantar Mantar) आंदोलन करणाऱ्या पैलवानांना (wrestlers) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पैलवानांकडून उभारण्यात आलेले तंबू उखडून फेकून देण्यात आले. पैलवान 23 एप्रिलपासून दिल्लीत धरणे आंदोलन करत आहेत.  

 

May 28, 2023, 02:03 PM IST

कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध पुन्हा 'दंगल', 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपूटंनी दंड थोपटले आहेत. 

 

Apr 24, 2023, 02:07 PM IST

Wrestlers Protest : अखेर ज्याची भीती होती तेच झालं! कुस्ती महासंघाला मोठा धक्का!

अखिल भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. अद्याप ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अशातच कुस्तीपटूंनी मोठा निर्णय घेत कुस्ती महासंघाला मोठा धक्का दिला आहे.

Jan 20, 2023, 08:47 PM IST