breaking news

Drunken police riot in Amravati PT45S

Video| अमरावती बेवड्या पोलिसाचा ST बसमध्ये धिंगणा...

Drunken police riot in Amravati
अमरावतीत पोलीस कर्मचा-यानं दारुच्या नशेत धिंगाणा घातलाय. अमरावतीतल्या खोलापूरमधील हा व्हिडीओ आहे. एसटी बसमध्ये कंडक्टर सोबत पोलिसाचा किरकोळ कारणावरून वाद झाला, त्यावरून पोलीस कर्मचा-यानं भर एसटीत कंडक्टरला अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून चालकानं थेट बस पोलीस ठाण्यात नेली. आणि तक्रार नोंदवली. दारूच्या नशेत धिंगाणा घालणा-या या पोलीस कर्मचा-याचं निलंबन करण्यात आलंय.

Aug 29, 2022, 11:40 AM IST
There will be land acquisition for bullet trains in the state PT56S

Video| राज्यात बुलेट ट्रेनसाठी मार्ग मोकळा! लवकर भूसंपादन

There will be land acquisition for bullet trains in the state
बुलेट ट्रेनसाठीचा भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झालाय. वनजमिनीच्या वापराला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिलीय. याबाबतचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवलेला. प्रकल्पासाठी 236.85एकर वनजमिनीचा वापर होणारय. राज्यात यापूर्वीच 94टक्के भूसंपादन झालंय. राज्यात सत्ताबदल होताच प्रकल्पाच्या कामानं वेग घेतलाय. 2वर्ष हे काम अत्यंत संथगतीनं सुरु होतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आता प्रकल्पासाठी सर्व सहकार्य करू असं स्पष्ट केलंय.

Aug 29, 2022, 11:00 AM IST
Amit Shah and JP Nadda on a visit to Mumbai in September PT1M4S

Video| मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकणार? अमित शहा आणि जेपी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर

Amit Shah and JP Nadda on a visit to Mumbai in September

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात तर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 15 आणि 16 सप्टेंबरला मुंबई दौ-यावर येत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का देण्यासाठी रणनीती आणि मुंबई महापालिका निवडणूक तयारीचा आढावा या दोन्ही नेत्यांकडून घेतला जाणारेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेत्यांशी यावेळी चर्चा होण्याची शक्यताय.

Aug 29, 2022, 10:55 AM IST
Annual General Meeting of Gokul Dudh Sangh at Kolhapur PT46S

Video| कोल्हापुरात गोकुळ दुध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

Annual General Meeting of Gokul Dudh Sangh at Kolhapur
कोल्हापुरात गोकुळची 60 वी वार्षिक सभा आज दुपारी 1 वाजता होणाराय...या सभेच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गट पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत...विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या धुरळ्यातच सभेत दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर कार्यकर्त्यांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलाय...सभेला गोकुळ संघाचे सत्ताधारी सतेज पाटील, मुश्रीफ उपस्थित राहणारय. तर खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिकही उपस्थित राहणारयत. तर शेवटच्या सभासदाचं समाधान होईपर्यंत सभा चालवू असं सतेज पाटील म्हणालेयत.

Aug 29, 2022, 10:30 AM IST
11 year old boys died in an accident in Jalgaon PT49S

Video| कारची शर्यतीने घेतला चिमुकल्याचा जीव... जळगावात भीषण अपघात

11 year old boys died in an accident in Jalgaon

जळगावात कारच्या शर्यतीने 11 वर्षांच्या मुलाचा जीव घेतलाय...जळगाव शहरातील मेहरून ट्रॅकवर 11 वर्षांचा मुलगा सायकल फिरवत होता...त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कारची शर्यत लावण्यात आली होती. यामध्ये एका कारने विक्रांत मिश्राला जोरदार धडक दिली...हा अपघात इतका भीषण होता की विक्रांत सायकलसह फुटबॉलसारखा हवेत उडाला...आणि त्याची सायकल झाडवरच अडकलीय...जोरात धडक लागल्याने विक्रांतचा मृत्यू झाला....या घटनेनं एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी करत गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी केलीय...यानंतर पोलिसांनी कारची शर्यत लावणा-या तिघांना अटक केलीय...

Aug 29, 2022, 10:25 AM IST
Top Speed news  bulletin PT12M58S
milk price hike from 1st september PT38S

Video | दूध सात रुपयांनी महागणार...

milk price hike from 1st september

मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणाराय...अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर आता मुंबईत सुटे दूध महागणार आहे.त्यामुळे एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत..चा-याचे दर दुप्पट झाले आहेत...तूर, हरभ-याच्या किमती 15 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत...त्यामुळे दरवाढ केल्याचं सांगण्यात आलंय...ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असेल

Aug 29, 2022, 08:35 AM IST

बँकांची कामे आत्ताच उरकून घ्या! या आठवड्यापासून भरमसाठ सुट्ट्या; बँकेत जाण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी

सप्टेंबर महिन्यात सुट्ट्यांची भरमार आहे. वर्षाच्या या नवव्या महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे. त्यामुळे या महिन्यात बँकेत (Bank) जाण्यापूर्वी तुम्ही सुट्ट्यांची यादी (Holiday List) तपासली पाहिजे.

Aug 28, 2022, 05:29 PM IST

PM मोदींची मोठी घोषणा! भारतात लवकरच 6G सेवा सुरु करणार; जाणून घ्या टाइमलाइन

देशभरात ऑक्टोबरपासून 5जी (5G) सेवा सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या नेटवर्कची घोषणा केली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत देशात

Aug 28, 2022, 05:01 PM IST

India vs Pakistan Asia Cup: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान काळ्या फिती बांधून उतरणार, कारण...

आज भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात खेळला जाणार आहे.  या सामन्याआधीपासूनच क्रिकेटविश्वातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. असे असताना पाकिस्तानचे सर्व खेळाडू...

Aug 28, 2022, 04:44 PM IST