breaking news

Eknath Shindes focus on Mumbai municipal elections PT1M13S

Video | एकनाथ शिंदे यांचे मिशन BMC इलेक्शन

Eknath Shindes focus on Mumbai municipal elections
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्यायत. यात मुंबईसाठी 5 विभागप्रमुख तर 3 विभाग संघटकाना पक्ष बांधणी करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलीय. मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही चेह-यांकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली. या सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. या सर्व जणांना पक्षविस्ताराचं काम सुरू करण्यास सांगण्यात आलंय. ((याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची मागाठाणे विधानसभा विभागप्रमुखपदी तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-असल्फा विधानसभा विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर नव्यानं या नियुक्त्या जाहीर झाल्यानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील

Aug 30, 2022, 08:15 AM IST
Increased meetings between Raj Thackeray and BJP leaders PT52S
first look of GSB Ganpati with full gold Jewelry PT34S

Video| सोन्याने मढलेल्या जीएसबी मंडळाच्या गणरायाची पहिली झलक

first look of GSB Ganpati with full gold Jewelry
मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती बाप्पाचं विराट दर्शन झालं. किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा हा गणपती सोन्याच्या दागदागिन्यांनी मढवलेला आहे. यंदा या मंडळाचं ६८ वं वर्षं आहे. या सुवर्णालंकारांनी विभूषित बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी मोठी रीघ लागते...

Aug 30, 2022, 07:45 AM IST
Upgraded Pinaka rocket successfully test fired PT34S

Video| पिनाकची मारक क्षमता वाढली! चीनने घेतला धसका; पाकिस्तानच्या उरात धडकी

Upgraded Pinaka rocket successfully test fired
डीआरडीओने पिनाका या रॉकेट्सची रेंज वाढवली आहे. त्याच्या चाचण्या गेल्या काही दिवसांपासून बालासोर आणि पोखरण या भागात सुरू आहेत. पिनाकाच्या अॅडव्हान्स्ड व्हर्जनच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. लक्ष्यावर पिनाका अॅडव्हान्स व्हर्जन पिनपॉईंट मारा करत आहे.

Aug 29, 2022, 01:15 PM IST
Sharad Pawar entry into Eknath Shinde stronghold PT41S

Video| शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात एंंट्री

Sharad Pawar entry into Eknath Shinde stronghold
शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात
- शरद पवार ठाण्यात दाखल
- पवारांची पदाधिका-यांसोबत आढावा बैठक
- ठाणे जिल्ह्यात पक्षाला ताकद देण्यासाठी पवारांचा दौरा
- ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक आणि डावखरे कुटुंबीयांनी भाजपची वाट धरल्यानंतर जितेंद्र आव्हाड एकाकी पडलेत. जितेंद्र आव्हाडांना पाठबळ देण्यासाठी शरद पवार ठाण्यात
- ठाणे जिल्ह्याच्या आढाव्यानंतर पवार राज्याचा दौरा करणार
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची तयारी
- मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रा सुरू करणारेत
- शरद पवारही ठाणे जिल्ह्यातूनच निवडणुकीच्या तयारीला लागलेत

Aug 29, 2022, 01:10 PM IST
NCP Protest At Pune On GST PT1M48S

Video | पुण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

NCP Protest At Pune On GST
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईविरोधात जनआक्रोश आंदोलन केलं...खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झालीय...तसंच घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेल्या GST च्या विरोधात केंद्र सरकारवर सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला...

Aug 29, 2022, 01:05 PM IST
Prices of vegetables in Pakistan increased PT42S

Video| टोमॅटो 500 रुपये किलो, कांदे 400 रुपये किलो... भाज्या महागल्या

Prices of vegetables in Pakistan increased

पाकिस्तानात महागाईने सर्वसामान्यांना हैराण केलंय. पाकिस्तानात टोमॅटो 500 रूपये, कांदे 400 रूपये, बटाटा 120 रूपये किलोने विकला जातोय. लाहोर, पंजाब प्रांतातल्या पूरस्थितीमुळे पाकिस्तानात भाज्यांच्या किंमती कमालीच्या कडाडल्या आहेत. त्यामुळे आता भारतातून भाजी आयात करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. पाकिस्तानात आधीच महागाई थैमान घालतेय. त्यात पूरस्थितीमुळे या महागाईत कित्येक पटींनी भर घातलीय. बलुचिस्तान, सिंध, दक्षिण पंजाब भागातून येणा-या भाज्यांची आवक घटलीय. त्यामुळे वाघा बॉर्डरवरून भाज्या मागवण्याचा पाकिस्तानचा विचार आहे.

Aug 29, 2022, 12:05 PM IST
Who will be the National President of Congress? PT40S

Video| राहुल गांधी होणार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष?

Who will be the National President of Congress?

काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीआधी काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची मनधरणी सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी हरीश रावत, मल्लिकार्जुन खडगे, सलमान खुर्शिद या नेत्यांनी राहुल गांधींच्या कानावर कार्यकर्त्यांची भावना घातल्याची माहिती आहे. 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. 19 ऑक्टोबरला काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळतील. 2024 मध्ये विरोधी पक्षाचं नेतृत्व करू शकतील असे एकमेव नेता म्हणजे राहुल गांधी असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे.

Aug 29, 2022, 12:00 PM IST