bjp

तेलंगणात काँग्रेसच्या सरकारमध्ये अकबरुद्दीन ओवेसींना मोठी जबाबदारी; भाजप म्हणतं, 'हिंदूंना मारण्याची...'

Akbaruddin Owaisi : तेलंगणा विधानसभेत काँग्रेसकडून एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे या निर्णयाला भाजपाने विरोध केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली आहे.

Dec 9, 2023, 09:23 AM IST

VIDEO: ...अन् अचानक देंवेंद्र फडणवीसांसमोर आले नवाब मलिक; नंतर काय झालं पाहा

नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. 

 

Dec 8, 2023, 03:55 PM IST

दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

देवेंद्र फडणवीसांचे देशप्रेम नकली असल्याची टीका करत  नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे. दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. 

Dec 8, 2023, 03:04 PM IST

एका महिन्यात बंगले रिकामे करा, भाजपाच्या 8 खासदारांना आदेश; नेमकं काय झालं?

भाजपाच्या 8 खासदारांना घरं रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने ही नोटीस पाठवली असून, एका महिन्यात घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे. 

 

Dec 8, 2023, 11:47 AM IST

'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस यांनी आपला आक्षेप पत्रातून नोंदवला आहे.

Dec 8, 2023, 06:47 AM IST

'दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या' उद्धव ठाकरेंचं आव्हान, तर भाजप म्हणतं...

Maharashtra Poliltics : धारावी पुनर्विकासासंदर्भात जाब विचारण्यासाठी धारावी ते अदानी ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. आपल्यासाठी नाहीतर मुंबईसाठी मोर्चा काढायचा आहे. महाशक्ती नाही तर महाजनता दाखवायची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. मोर्चाचं नेतृत्व मी स्वत: करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Dec 5, 2023, 04:29 PM IST

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष फुटणार? आमदारांचा मोठा गट भाजपत जाणार?

3 राज्यात भाजपकडून काँग्रेसनं सपाटून मार खाल्ला. मात्र, याचे हादरे महाराष्ट्र काँग्रेसला बसू शकतात. 

Dec 4, 2023, 08:07 PM IST
Buldhana BJP Chief Suspended Arogant BJP Leaders And Workers For Six Years PT46S

'इंडिया'त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?

Assembly Election Results 2023 : तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पुरतं पानिपत झालं. तर भाजपनं पुन्हा एकदा देदिप्यमान विजय मिळवला. पराभवानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा इंडिया आघाडीची (INDIA) मोट बांधायला सुरूवात केलीय.

Dec 3, 2023, 08:32 PM IST

भाजपचा जायंट किलर! मुख्यमंत्री केसीआर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणारे कट्टीपल्ली वेंकट आहेत तरी कोण?

Kamareddy assembly constituency : मदर ऑफ ऑल बॅटल, अशी तेलंगाणाची कामारेड्‌डी हा मतदारसंघ बनला होता. 2018 च्या निवडणुकीत बीआरएस उमेदवार गम्पा गोरवधन यांनी ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीतही (Telangana Assembly Elections) काँग्रेसने येथून विजय मिळवला होता. आता कट्टीपल्ली वेंकट (Venkata Ramana Reddy) यांनी दणदणीत विजय मिळवलाय.

Dec 3, 2023, 08:05 PM IST

Assembly Elections : 'आम्ही वचन पूर्ण करू...', तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

Assembly Elections Results 2023 : तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे. 

Dec 3, 2023, 07:23 PM IST

Telangana Election : मुख्यमंत्री शिंदेंनी प्रचार केलेल्या 'त्या' भाजपा उमेदवाराचं झालं काय?

Telangana Election Result 2023 : तेलंगणा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवारांचा निकाल हाती आला आहे. मुख्यंमंत्री शिंदे यांनी भाजपाच्या दोन उमेदवारांचा प्रचार केला होता.

Dec 3, 2023, 02:49 PM IST

'पनौती कोण?'; काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने लगावला टोला

Assembly Elections Result 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणा काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसला पराभव समोर दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूने काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Dec 3, 2023, 02:20 PM IST