bhaskar jadhav

अजित पवारांचा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उभे करणा-यांना फटकारले. त्यांचा रोख भास्कर जाधव यांच्याकडं होता. नगरपालिका निवडणूकीत चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या मुलानं पक्षा विरोधात आघाडी उभी केली होती. अजित पवार यांनी भाषणात जाधव यांचं नाव घेतलं नाही. अशा घटनांमुळं पक्षशिस्त मोडते असं त्यांनी स्पष्ट केलं.

Jan 8, 2012, 02:14 PM IST

'नारायणा'चं तेज ‘भास्करा’मुळे झाकोळलं!

सिंधुदुर्ग या उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले असून सावंतवाडी नगरपालिकेवर सर्व १७ जागा जिंकत राष्ट्रवादीनं आपला झेंडा फडकवला आहे. काँग्रेसला सावंतवाडीत खातंही खोलता आलेलं नाही. सावंतवाडीच्या या निकालानंतर काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फेरमोजणीची मागणी केली आहे.

Dec 12, 2011, 08:42 AM IST

राणेंचा गृहमंत्रालयावर हल्लाबोल

भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालवरच्या हल्ल्याप्रकरणी खा. नीलेश राणे यांना नाहक गोवण्यात येतयं, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय.

Nov 10, 2011, 05:06 AM IST

कोकणचा राजा कोण ?

कोकणचा विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा राजकीय पट पुरता बदलला. समाजवादी आणि काँग्रेस अशा लढाईचं केंद्र असलेला हा प्रदेश समाजवादाची कास सोडून भगवा झाला आणि आता याच लाल मातीत वेगवेगळी संस्थानं निर्माण झाली.

Nov 8, 2011, 05:28 PM IST

कोकणात ‘गुंडा’राज

सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखं दहशतीचे वातावरण संपूर्ण राज्यात कोठेही नाही. मी एका उद्योजकाला सिंधूदुर्गात गुंतवणूक का करत नाही असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की तिथल्या गुंडाराजमुळे भीती वाटते. मी संपूर्ण राज्यात फिरतो पण इतकी भयाण परिस्थिती कुठेही नाही.

Nov 8, 2011, 05:09 PM IST

राणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !

मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली.

Nov 8, 2011, 12:55 PM IST

चिपळूणमध्ये तणाव

राणे विरुद्ध जाधव वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यामुळं चिपळूणमध्ये तणावाचं वातावरण पसरलंय.

Nov 8, 2011, 05:54 AM IST