Breakup News: तरुणांवर सिनेमा, सोशल मीडियाचा प्रभाव वाढतोय. नको तेच नेमकं आजकालच्या पिढीला भावतं. त्यामुळे सध्याच्या जमान्यात रिलेशनमध्ये येणं आणि ब्रेकअप होणं यात काही मोठी गोष्ट राहिली नाही. पण ब्रेकअपनंतर काहीजण डिप्रेशनमध्ये जातात, काहीजण आपल्या बॉयफ्रेण्ड/गर्लफ्रेण्डचा पिच्छा सोडत नाहीत. रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड अशा गोष्टी करतात, ज्यामुळे त्यांच्या एक्स-पार्टनरला मनस्ताप होतो. अशावेळी पोलीस तक्रार करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशाच एका घटनेत मुलीने आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
एका तरुणीची ब्रेकअपनंतरची पोस्ट सोशल मीडियात खूप व्हायरल झाली आहे. तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेण्डवर वेगळ्या पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप केलाय. ब्रेकअपनंतर मी माझ्या एक्स बॉयफ्रेण्डला सर्वत्र ब्लॉक केले आहे. यामुळे तो आता यूपीआयद्वारे दर मिनिटाला एक रुपये पाठवून माझ्यावर अत्याचार करत आहे. यामुळे मी मेंटल ट्रॉमामधून जात आहे. यावर मात करण्यासाठी मी काही लोकांकडून सल्लाही मागितल्याचे ती म्हणाली.
Blocked him from everywhere now he is sending 1rs on gpay every fkin minute
— Ayushi (@ShutupAyushiii) November 20, 2024
एखादं अनेक वर्षे सुरु असलेलं रिलेशन अचानत तुटलं की पार्टनर एकमेकांना जबाबदार धरतात.ब्रेकअपनंतरही जोडीदार एकमेकांचा पाठलाग करतात किंवा हेरगिरी करतात, या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण तरुणीने इंटरनेटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने वेगळीच व्यथा मांडली आहे. ब्रेकअप झाल्यानंतर माझ्या एक्सला मी सर्वत्र ब्लॉक केलंय पण तरीही तो माझा पाठलाग सोडत नाही, असे तिने सांगितले. तो ऑनलाइन पेमेंट ॲपद्वारे माझ्या यूपीआय अकाऊंटवर प्रत्येक मिनिटाला 1 रुपया पाठवतोय.यामुळे मी खूप अस्वस्थ झाले असून माझ्यासाठी मानसिक आघात असल्याचे ती सांगते.
मुलीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हायरल पोस्टवर लोक प्रतिक्रिया आणि कमेंट करत आहेत. काहीजण तिच सांत्वन करत आहेत तर काहीजण तिच्या पोस्टची खिल्ली उडवत आहे. एका यूजरने लिहिले, बॉयफ्रेण्डच्या अशा कृत्यामुळ तुमची फुकटची कमाई होतेय. तुम्हाला त्रास होतोय मग तुम्ही त्याला इथेही ब्लॉक का करत नाही? असा प्रश्न विचारला. आणखी एका यूजरने लिहिले की, ' त्याचे हे कृत्य सुरु राहू द्या, संपूर्ण वर्षात तुम्ही 51 हजार 8400 रुपये कमावले असाल. काही युजर्सनी याला पेन्शन योजना म्हटले आहे. मात्र, काही लोकांनी मुलीला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचा सल्लाही दिला आहे. एक्स बॉयफ्रेण्डवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला यूजर्सनी दिलाय.
जर तुम्हीही अशा परिस्थितीत अडकलात तर लगेच तुमच्या एक्स साथीदाराला कडक शब्दात समज द्या.
ताकीद देऊनही त्याने पाठलाग करणे थांबवले नाही, तर लगेच पोलिसांना कळवा.
या मुलीप्रमाणेच तुमचा एक्स जोडीदारही तुमचा ऑनलाइन छळ करत असेल, तर सायबर पोलिसात तक्रार करा.
या परिस्थितीबद्दल आपल्या पालकांना अवश्य कळवा जेणेकरुन ते हे प्रकरण गंभीरपणे घेतील आणि आवश्यक ती कारवाई करू शकतील.