bhandara police

टाकीतून पाणी काढत असताना सापडला 14 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह! भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार

Bhandara News : भंडाऱ्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यात एका चौदा वर्षाच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 27, 2023, 08:05 AM IST

Video : नातेवाईकांसह बोलण्यासाठी गाडी बाजूला घेतली अन्... भंडाऱ्यात पती पत्नीला ट्रकने चिरडलं

Bhandara News : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे.

Aug 28, 2023, 01:38 PM IST

बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी महिलांनी अंगावरच्या साडीचा केला दोर; एक वाचला, पण...

Bhandara News : भंडाऱ्यात कासव पकडण्याच्या नादात दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कासव पकडण्यासाठी तिघेजण विहीरात उतरले होते. मात्र गुदमरल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.

Jul 26, 2023, 01:22 PM IST

फेसबुकवरुन DRDO मध्ये नोकरीची संधी, जाहिरात पाहून अडकल्या तरुणी; लाखोंची फसवणूक

Bhandara Crime : भंडाऱ्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींची एवढी मोठी फसवणूक झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्यानंनी पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Jul 8, 2023, 01:41 PM IST

'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ

तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.

Jun 21, 2023, 08:49 PM IST

अर्धनग्नावस्थेत स्मशानात सोडलं अन्... मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा असा लागला छडा

Bhandara Crime : भंडाऱ्यातील गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरोपीने 47 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिला अर्धनग्न अवस्थेत सोडून पळ काढला होता. पोलिसांनी या आरोपीला पाच दिवसांनी अटक केली आहे.

May 4, 2023, 04:19 PM IST

धक्कादायक! 40 दिवसांपूर्वी घरातून निघाला अन् गायब झाला... आधार कार्डमुळे उलघडलं कुजलेल्या मृतदेहाचे रहस्य

Bhandara Crime : 40 दिवसांपूर्वी ही व्यक्ती घरातून काहीच न सांगता अचानक निघून गेली होती. मात्र अचानक साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या इटगावमध्ये या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे

Apr 8, 2023, 11:11 AM IST

Bhandara Crime : स्मशानात आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह; ओळख लपवण्यासाठी केले धक्कादायक कृत्य

Bhandara Crime  : भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह एका पोत्यात भरून ठेवण्यात आला होता

 

Mar 31, 2023, 01:46 PM IST

Crime News : पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर; भरधाव ट्रेलरने पोलीस उपनिरिक्षकाला चिरडले

Bhandara crime : भंडारा जिल्ह्यात पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. 24 तासात दुसऱ्यांदा भंडारा पोलिसांचा अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे

Mar 26, 2023, 03:17 PM IST

Bhandara crime : शेतातून दूध घेऊन परतणाऱ्या तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह आढळल्याने गावात खळबळ

Crime News : भंडाऱ्यात झालेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. अत्यंत निर्घृणपणे तरुणाची हत्या झाल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे

Mar 23, 2023, 04:01 PM IST

धक्कादायक! तरुणीला पळवल्याचा राग, तरुणीच्या कुटुंबियांकडून दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या

दिवसाढवळ्या झालेल्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, पोलीस आरोपींच्या शोधात

Jun 3, 2022, 09:26 PM IST

वडिलांच्या नावाला त्याने काळीमा फासला, मित्रांच्या नादाला लागून दरोडा घातला

साकोलीपासून 15 किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. 

May 11, 2022, 06:01 PM IST

आरोपींना अटक करायला गेले आणि मटण पार्टी करुन आले, पोलिसांचा VIDEO व्हायरल

मटणावर आडवा हात मारणाऱ्या पोलिसांचं धक्कादायक संभाषणही व्हिडिओत रेकॉर्ड 

Apr 28, 2022, 03:04 PM IST

दरवाजा उघडा पाहून घरात शिरला चोर! डाव फसल्याने सटकली, पती-पत्नीवर केला वार

चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूनी वार, पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

Feb 28, 2022, 06:47 PM IST

नाना पटोलेंनी उल्लेख केलेला तो 'गावगुंड मोदी' सापडला, पण...

राजकारण तापवणारा तो व्यक्ती खरचं 'गावगुंड मोदी' आहे का?

Jan 21, 2022, 07:22 PM IST