'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ

तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.

Updated: Jun 21, 2023, 08:49 PM IST
'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : इंटरनेटच्या युगात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पण आता चक्क शस्त्रही ऑनलाईन विकली (Online Arms Sales) जात असल्यास समोर आलं आहे. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी तस्करांकडून सोशल मीडियाचा (Social Media) सर्रास वापर केला जात आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असून काही लोकांचे फेसबूक पेज (Facebook) हॅक केले जात असून अशा कारवाया केल्या जात असल्याचंही उघड झालं आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?
तुम्हाला देशी कट्टा हवं आहे!  मग हा फेसबुक वरील मॅसेज नकी वाचा. भूपेश मोठघरे नावाच्या फेसबुक पेजवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल करा आणि तुम्हाला देशी कट्टा, बंदूक, रिव्हॉलवर मागवा, असा मॅसेज फेसबूकवर टाकण्यात आला. हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला. मेसेज व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु केली. भूपेश मोठघरे हा मूळचा भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील अड्याळ इथला रहिवासी आहे. पोलिसांनी भूपेशला शोधून काढलं, पण जेव्हा त्याला याबाबत कळलं, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. वास्तविक भूपेश या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ होता. बरेच दिवस त्याने आपलं फेसबूक पेज पाहिलं नव्हतं. 

भंडारा जिल्ह्यातील भूपेश मोठघरे याचं फेसबूक पेज हॅक करण्यात आलं होतं. भंडारा पोलिसांनी याचा तपास केला असता भूपेशचं फेसबूक अकाऊंट राजस्थानमधून ऑपरेट केलं जात असल्याचं समोर आलं आहे. यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे आणि शस्त्र विकण्याचा त्याचा उद्देश काय आहे याचा पोलीस तपास करत आहेत. हा खोडसाळपणा आहे की खरच सोशल मीडियाचा वापर करुन ऑनलाईन शस्त्र विकली जात आहेत, हे शोधणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

अल्पवयीन मुलाला मारहाण
विरार पूर्वेकडील दत्तनगर इथं क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा चेंडू घरात गेल्याने संतापलेल्या इसमाने एका अल्पवयीन मुलाला पळवून पळवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा सर्व प्रकार सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे..विरार पोलसांनी याप्रकरणी या व्यक्तीला नोटीस पाठवली आहे. विरारच्या दत्त नगर मधील बिल्डींगच्या आवारात काही मुले खेळत होती. त्यावेळी किशोर ढवळे यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून चेंडू आत गेल्याने संतप्त झालेल्या किशोरने अल्पवयीन मुलाला पळवून पळवून मारहाण केली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. या मारहाणीचा धसका घेतल्याने मुलगा आता घराबाहेर जाण्यास घाबरत आहे.