audit

ऑडिट नागपूर जिल्ह्याचं...

महाराष्ट्राची उपराजधानी असं ज्या शहराची ओळख आहे. संत्रानगरी नागपूर, देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं हरीत शहर... भारताचा मध्य अशी अनेक वैशिष्ट्य लाभलेला नागपूर जिल्हा. राज्याच्या राजकीयपटलावर या जिल्ह्याला महत्त्व आहे. 

Oct 8, 2014, 05:49 PM IST

ऑडिट रत्नागिरी जिल्ह्याचं...

विस्तिर्ण समुद्र किनारा, नारळ-पोफळी आणि आंबाच्या बागांनी वेढलेला रत्नागिरी जिल्हा...  पौराणिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जिल्ह्याला तेव्हडंचं राजकीय महत्व आहे.

Oct 8, 2014, 05:33 PM IST

ऑडिट सांगली जिल्ह्याचं...

सांगली नाट्यपंढरी, सहकारपंढरी म्हणून जेवढी प्रसिद्ध तेव्हढीच क्रांतीकारकांची जवानांची नगरी म्हणूनही सांगलीची ओळख आणि राजकीय पटलावर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले वसंतदादा पाटील हेही याच सांगली जिल्ह्याचे सुपूत्र.

Oct 8, 2014, 05:19 PM IST

ऑडिट पालघर जिल्ह्याचं...

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात राजकीयपक्षांची असलेली ताकत आता आपण बघितलंय. आता आपण पाहणार आहोत काही मोजक्या मतदारसंघातील एकूण परिस्थिती.

Oct 8, 2014, 05:07 PM IST

ऑडिट रायगड जिल्ह्याचं...

राज्याची राजधानी मुंबई शहराला लागून असलेला रायगड जिल्हा. तांदळाचं कोठार अशी ओळख असलेल्या या जिल्ह्याला राजकीय पटलावरही तेव्हढचं महत्त्व आहे. कुलाबा जिल्हा अशी पूर्वीची ओळख असलेल्या या जिल्ह्याला 1 जानेवारी 1981 पासून रायगड जिल्हा म्हणून नवी ओळख मिळाली.

Oct 8, 2014, 04:37 PM IST

ऑडिट लातूर जिल्ह्याचं...

महाराष्ट्राच्या दक्षिणपूर्व सीमेवर असलेला हा जिल्हा... औरंगाबाद विभागातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे असून महाराष्ट्राच्या राजकारणतही या  जिल्ह्यातील नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

Oct 8, 2014, 04:31 PM IST

ऑडिट जालना जिल्ह्याचं

स्टील सिटी, बियाण्यांची पंढरी, कापडाची मराठवाड्यातली सर्वात मोठी बाजारपेठ अशी जालन्याची ओळख. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही जालना हा मराठवाड्यातील एक अत्यंत महत्वाचा जिल्हा.

Oct 8, 2014, 03:20 PM IST

ऑडिट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं

दुर्ग किल्यामुळे ओळख लाभलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा... लाल तांबड्या मातीतला इरसाल कोकणीपणा ते मच्छी-सोलकढीपर्यंत अनेक वैशिष्ठ्याने सजलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा.

Oct 8, 2014, 02:07 PM IST

ऑडिट - बुलढाणा जिल्ह्याचं

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊचं जन्म स्थळ असलेलं सिंदखेडराजा, खाऱ्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल लोणार सरोवर, विदर्भाची पंढरी श्रीसंत गजानन महाराज यांची संतनगरी शेगाव हि खर्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे. 

Oct 8, 2014, 01:49 PM IST

ऑडिट - सोलापूर जिल्ह्याचं

सोलापूर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेला जिल्हा अशी जशी सोलापूरची ओळख. तशीच जिल्ह्यातल्या सुपुत्रांना अतिउच्च पदं मिळवून देणाराही हाच जिल्हा...महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळलेले सुशीलकुमार शिंदे याच जिल्ह्याचे. जिल्ह्याच्या वाट्याला आणखी एक योग जुळून आला तोच म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद एकाचवेळी मिळण्याचा हा योग... सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे दोन्ही सुपूत्र राज्याचं नेतृत्व करत होते. त्यामुळे एकूणच राजकीय पटलावर सोलापूर जिल्हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. 

Oct 8, 2014, 01:02 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सोलापूर मध्य

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे नेतृत्व करतात. काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची मोठी संख्या आहे.

Oct 8, 2014, 12:49 PM IST

ऑडिट वर्सोवा : अर्ज बाद, शिवसेनेची मते कोणाला मिळणार?

 शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानं वर्सोवामध्ये या निवडणुकीत धनुष्यबाण नाहीय. त्यामुळं शिवसेनेची मतं कुणाच्या पारड्यात पडतात. यावर विजयाचं गणित अवलंबून असणाराय. काँग्रेसचे विद्यमान आमदार बलदेव खोसांपुढं राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपचं आव्हान आहे. 

Oct 8, 2014, 11:57 AM IST

ऑडिट : पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला

कराड दक्षिण मतदारसंघातल्या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय. 

Oct 8, 2014, 09:52 AM IST

ऑडिट - जळगाव जिल्ह्याचं

जळगावची केळी जशी जगभर प्रसिद्ध तसा संतविचार आणि कृषीआचाराने महाराष्ट्राला संपन्न वारसा देणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख म्हणावी लागेल.

Oct 7, 2014, 08:54 PM IST