ऑडिट - जळगाव जिल्ह्याचं

जळगावची केळी जशी जगभर प्रसिद्ध तसा संतविचार आणि कृषीआचाराने महाराष्ट्राला संपन्न वारसा देणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख म्हणावी लागेल.

Updated: Oct 7, 2014, 09:35 PM IST
 title=

जळगाव : जळगावची केळी जशी जगभर प्रसिद्ध तसा संतविचार आणि कृषीआचाराने महाराष्ट्राला संपन्न वारसा देणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख म्हणावी लागेल.

बालकवी ठोंबरे यांची ही जन्मभूमी, राजकिय दृष्ट्या बोलायचं झालं तर जळगाव जिल्ह्यातून सुरेशदादा जैन, एकनाथ खडसे, गुलाब देवकर अशी मातब्बर मंडळी राज्याच्या राजकारणात आली आहेत. 

जळगाव जिल्ह्यात मतदारसंघ पुनरर्चनेनंतर विधानसभेचे तब्बल अकरा मतदारसंघ तयार झालेत. त्यापैकी राष्ट्रवादीकडे पाच, भाजपकडे दोन, शिवसेनेकडे दोन, अपक्षांकडे दोन, आणि  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहयोगी आमदारांकडे प्रत्येकी एक जागा आहे. 

तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघांमुळे जळगावला राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व प्राप्त झालंय. 
- जळगाव ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर
- चाळीसगावमध्ये राष्ट्रवादीचे राजीव देशमुख, 
- भुसावळमध्ये राष्ट्रवादीचे संजय सावकारे
- पाचोरामध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वाघ,
- चोपडात राष्ट्रवादीचे जगदीश वळवी
- जामनेरमध्ये भाजपाचे गिरीश महाजन, 
- मुक्ताईनगरमध्ये भाजपचे एकनाथ खडसे
- जळगाव शहरमध्ये शिवसेनेचे सुरेश जैन विद्यमान आमदार आहेत. 
- एरंडोलमध्ये शिवसेनेचे चिमणराव पाटील- अमळनेरमध्ये कृषीभूषण साहेबराव पाटील हे निवडून आलेत. 
- रावेरमध्ये अपक्ष शिरीश चौधरी

असं सध्या जळगाव जिल्ह्याचं राजकीय बलाबल आहे.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.