रत्नागिरी : विस्तिर्ण समुद्र किनारा, नारळ-पोफळी आणि आंबाच्या बागांनी वेढलेला रत्नागिरी जिल्हा... पौराणिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जिल्ह्याला तेव्हडंचं राजकीय महत्व आहे.
या जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून त्यामध्ये 7,30,554 मतदार आहेत.
जिल्ह्यातील राजकीय बलाबलाचा विचार करता तीन शिवसेनेकडं तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत.
दापोली विधानसभा मतदारसंघातून सुर्यकांत दळवी हे शिवसेनेचे आमदार आहेत.
गुहागर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रावादी काँग्रेसच्या ताब्यात असून भास्कर जाधव हे या मतदारसंघाचे आमदार आहेत.
चिपळूण विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेची सत्ता असून सदानंद चव्हाण हे शिवसेनेचे आमदार आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रावादी काँग्रेसचे उदय सामंत आमदार असून ते राज्याचे नगरविकास राज्यमंत्री आहेत.
तर राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन साळवी आमदार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याचं हे राजकीय बलाबल आहे..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.