ऑडिट - सोलापूर जिल्ह्याचं

सोलापूर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेला जिल्हा अशी जशी सोलापूरची ओळख. तशीच जिल्ह्यातल्या सुपुत्रांना अतिउच्च पदं मिळवून देणाराही हाच जिल्हा...महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळलेले सुशीलकुमार शिंदे याच जिल्ह्याचे. जिल्ह्याच्या वाट्याला आणखी एक योग जुळून आला तोच म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद एकाचवेळी मिळण्याचा हा योग... सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे दोन्ही सुपूत्र राज्याचं नेतृत्व करत होते. त्यामुळे एकूणच राजकीय पटलावर सोलापूर जिल्हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. 

Updated: Oct 8, 2014, 01:02 PM IST
 title=

सोलापूर : सोलापूर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेला जिल्हा अशी जशी सोलापूरची ओळख. तशीच जिल्ह्यातल्या सुपुत्रांना अतिउच्च पदं मिळवून देणाराही हाच जिल्हा...महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळलेले सुशीलकुमार शिंदे याच जिल्ह्याचे. जिल्ह्याच्या वाट्याला आणखी एक योग जुळून आला तोच म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद एकाचवेळी मिळण्याचा हा योग... सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे दोन्ही सुपूत्र राज्याचं नेतृत्व करत होते. त्यामुळे एकूणच राजकीय पटलावर सोलापूर जिल्हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा मतदार संघ यामध्ये भाजपकडे दोन, काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादीकडे चार आणि स्वाभिमान, शेकाप आणि अपक्ष एक-एक असं जिल्ह्याचं बलाबल आहे. 

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख यांनी 10090 मताधिक्याने विजय मिळवला. अक्कलकोटमध्ये  भाजपच्याच सिद्रामप्पा पाटील यांनी 1385 च्या मताधिक्याने बाजी जिंकली. 

सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 33364 मताधिक्क्याने सोलापूर दक्षिणमध्ये दिलीप माने 17662 च्या मताधिक्क्याने विजयी झालेत. 

राष्ट्रवादीकडून करमाळ्यात शामल बागल 27817 माढ्यात बबनराव शिंदे 63169, मोहोळमध्ये लक्ष्मणराव ढोबळे 29179 आणि माळशिरसमध्ये हनुमंत डोळस 16226 मताधिक्क्याने विजयी झालेत. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भारत भालके पंढरपूरमधून 37363, सांगोलातून शेकापचे गणपतराव देशमुख 9804 तर बार्शीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे दिलीप सोपल यांनी अटीतटीच्या लढतीत 10209 मताधिक्क्याने विजय मिळवला होता. 

  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.