ऑडिट रायगड जिल्ह्याचं...

राज्याची राजधानी मुंबई शहराला लागून असलेला रायगड जिल्हा. तांदळाचं कोठार अशी ओळख असलेल्या या जिल्ह्याला राजकीय पटलावरही तेव्हढचं महत्त्व आहे. कुलाबा जिल्हा अशी पूर्वीची ओळख असलेल्या या जिल्ह्याला 1 जानेवारी 1981 पासून रायगड जिल्हा म्हणून नवी ओळख मिळाली.

Updated: Oct 8, 2014, 04:37 PM IST
 title=

रायगड : राज्याची राजधानी मुंबई शहराला लागून असलेला रायगड जिल्हा. तांदळाचं कोठार अशी ओळख असलेल्या या जिल्ह्याला राजकीय पटलावरही तेव्हढचं महत्त्व आहे. कुलाबा जिल्हा अशी पूर्वीची ओळख असलेल्या या जिल्ह्याला 1 जानेवारी 1981 पासून रायगड जिल्हा म्हणून नवी ओळख मिळाली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याचा विचार केल्यास सातपैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. 

काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडं प्रत्येकी एक-एक मतदारसंघ आहे. रायगड जिल्ह्यातील हे सध्याचं राजकीय बलाबल आहे.

उरण विधानसभा मतदारसंघातून विवेक पाटील शेकापचे आमदार आहेत. तर कर्जत विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड करत आहेत. 

काँग्रेसचे प्रशांत ठाकूर हे पनवेलचे आमदरा आहेत..तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांच्याकडं होतं.

अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापच्या मिनाक्षी पाटील या आमदार आहेत. पेण विधानसभेतून शेकापचेच धौर्यशील पाटील निवडून आले आहेत.

महाड विधानसभेचं प्रतिनिधीत्व शिवसेनेचे भारतशेठ गोगावले करत आहेत.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.