ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सिंदखेडराजा
राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मगाव ही सिंदखेडराजाची खास ओळख. राजकारणाचा विचार करायचा झालं तर या मतदारसंघातून चारवेळा विजयी बाजी मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे याना रोखण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा कंबर कसून सज्ज झालीय.
Oct 8, 2014, 01:35 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - अकोट
अकोला जिल्ह्यातील 'अकोट विधानसभा मतदारसंघाच्या क्षितिजावर 1990 पर्यंत काँग्रेसचा सूर्य कधी मावळत नव्हता', असं बोललं जायचं... पण, जिल्ह्याच्या राजकीय सारीपटावर भारिप-बहुजन महासंघ-शिवसेनेचा उदय झाला आणि इथली राजकीय समीकरणं बदलली. पाहूयात शिवसेनेचा भगवा घेतलेलेआमदार संजय गावंडे यांनी अकोटमध्ये काय विकास केलाय.
Oct 8, 2014, 01:24 PM ISTकॉलेजला दांडी मारून विद्यार्थी प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 01:22 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बाळापूर
अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ... गेल्या 25 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिलंय. गेल्या निवडणुकीत भारिपमधील तिकीट वाटपाच्या नाट्यात बळीराम सिरस्कारांना आमदारकीची लॉटरी लागली खरी. पण यावेळी चुरस आणखी रंगतदार ठरणार आहे.
Oct 8, 2014, 01:18 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - रिसोड
वाशीम जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ... हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा परंपरागत गड समजला जातो. लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या पोटनिवडणुकीत 'मोदी लाट' थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखत अमित झनक यांना १२ हजार मतांनी विजयी केले. म्हणूनच रिसोडच्या राजकीय आखाड्यात विधानसभेचा रणसंग्राम कसा रंगतोय याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
Oct 8, 2014, 01:10 PM ISTवांद्रे पश्चिम मतदार संघात भाजपची लागणार कसोटी
वांद्रे विधानसभा मतदार संघात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबा सिद्धीकी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सगळ्या महाराष्ट्रात बहुमताची हाक देणा-या भाजपला मुंबईच्या अध्यक्षांना विजय मिळवून देण्यासाठी चांगली मेहनत करावी लागणार आहे.
Oct 8, 2014, 01:04 PM ISTऑडिट - सोलापूर जिल्ह्याचं
सोलापूर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेला जिल्हा अशी जशी सोलापूरची ओळख. तशीच जिल्ह्यातल्या सुपुत्रांना अतिउच्च पदं मिळवून देणाराही हाच जिल्हा...महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळलेले सुशीलकुमार शिंदे याच जिल्ह्याचे. जिल्ह्याच्या वाट्याला आणखी एक योग जुळून आला तोच म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद एकाचवेळी मिळण्याचा हा योग... सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे दोन्ही सुपूत्र राज्याचं नेतृत्व करत होते. त्यामुळे एकूणच राजकीय पटलावर सोलापूर जिल्हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे.
Oct 8, 2014, 01:02 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बार्शी
बार्शी विधानसभा मतदारसंघात नेहमीच चुरशीची निवडणुक पहायला मिळते. गेल्या वेळी दिलीप सोपल यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजयी पताका फडकावली होती.
Oct 8, 2014, 12:59 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सांगोला
सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल पन्नास वर्षांपासून गणपतराव देशमुख नेतृत्व करताहेत. जनता त्यांच्यावर कायम विश्वास ठेवतेय.
Oct 8, 2014, 12:55 PM ISTग्राऊंड रिपोर्ट वर्धा : काँग्रेसचे वर्चस्व, मात्र अंतर्गत गटबाजीने संकट
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत वर्धा विधानसभा मतदारसंघात कसा प्रचार सुरू आहे? कोणाचे वर्चस्व आहे, यासंदर्भातला ग्राऊंड रिपोर्ट.
Oct 8, 2014, 12:51 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सोलापूर मध्य
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे नेतृत्व करतात. काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची मोठी संख्या आहे.
Oct 8, 2014, 12:49 PM ISTऑडिट वर्सोवा : अर्ज बाद, शिवसेनेची मते कोणाला मिळणार?
शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानं वर्सोवामध्ये या निवडणुकीत धनुष्यबाण नाहीय. त्यामुळं शिवसेनेची मतं कुणाच्या पारड्यात पडतात. यावर विजयाचं गणित अवलंबून असणाराय. काँग्रेसचे विद्यमान आमदार बलदेव खोसांपुढं राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपचं आव्हान आहे.
Oct 8, 2014, 11:57 AM ISTराहुल गांधी महाराष्ट्रात नको रे बाबा!
राज्यात शिवसेना, मनसे, भाजपने जोरदार प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, त्यामानाने काँग्रेसकडे स्टार प्रचारक नसल्याने काँग्रेस मागे पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांना प्रचारासाठी मागणी आहे. मात्र, आज पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी मैदानात उतरत असल्याने काँग्रेस गोटात थोडी धास्ती वाढलेली दिसत आहे. राहुल पेक्षा सोनिया गांधी हव्यात अशी मागणी आहे.
Oct 8, 2014, 11:44 AM ISTऑडिट पिंपरी : राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदार संघ
राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वाधिक सुरक्षित असलेला मतदार संघ म्हणून पिंपरी मतदार संघाकडं पाहिलं जातंय. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. कडवं आव्हान असलेला उमेदवार रिंगणात नसल्यानं बनसोडे यंदाही बाजी मारतील, असं चित्र दिसतंय.
Oct 8, 2014, 10:57 AM ISTअबब! ७ पोत्यांमध्ये ५ कोटी, राजकारण्यांनी आणला पैशांचा पूर
पुणे-सोलापूर महामार्गावरती मौजे पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी इथं अचारसंहिता भरारी पथकानं पाच कोटी रुपये पकडले. एका कारमधून सात पोत्यांमध्ये असलेली पाच कोटींची रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले.
Oct 8, 2014, 10:39 AM IST