ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बार्शी

बार्शी विधानसभा मतदारसंघात नेहमीच चुरशीची निवडणुक पहायला मिळते. गेल्या वेळी दिलीप सोपल यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजयी पताका फडकावली होती. 

Updated: Oct 8, 2014, 12:59 PM IST
 title=

सोलापूर : बार्शी विधानसभा मतदारसंघात नेहमीच चुरशीची निवडणुक पहायला मिळते. गेल्या वेळी दिलीप सोपल यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजयी पताका फडकावली होती. 
 
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदार संघ हा राज्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांचा असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने हा महत्वाचा मतदार संघ आहे.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - राजेंद्र राऊत
भाजप - राजेंद्र मिरगणे
काँग्रेस - सुधीर गाढवे
राष्ट्रवादी - दिलीप सोपल

एकेकाळी बार्शीची बाजारपेठ ही उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर पेक्षा ही मोठी होती, मात्र ती पुढे जावून ढेपाळली याला राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेने चे रवींद्र गायकवाड यांना तीस हजारांचं लीड मिळालंय. 

मात्र केलेली विकासकामे जनतेला माहित आहेत, असं सांगत सोपल यांना विजयाचा विश्वास आहे...
- बार्शी उपसा सिंचन योजनेला सुरुवात
- सात हजार हेक्टर शेत जमीन ओलिताखाली येणार
- गावागावात पिण्याच्या पाण्याच्या योजना
- लघु पाठबंधारे योजनांची दुरूस्ती
अशी विकासकामे केल्याचं सोपल सांगतात

अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले दिलीप सोपल यांनी गेल्या विधानसभेला कॉंग्रेस उमेदवार नारायण राणे यांचे समर्थक माजी आमदार राजाभाऊ राउत यांच्या विरोधात बंडखोरी करून विजयश्री खेचून आणली होती. इथली निवडणूक होते ती राऊत गट आणि सोपल गट यामध्येच... मात्र, राजाभाऊ राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता सामना आमनेसामने होणार आहे.  

बार्शीत अनेक विकासकामे थांबली असून सोपल यांनी कुठलीच विकासकामे गांभीर्याने केली नसल्याचा आरोप विरोधक करताहेत. त्यामुळे सोपल यांना राऊत यांचे आव्हान हेच यंदाच्या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य असणार आहे. मात्र ऐनवेळी उमेदवारीसाठी बदल झाल्यास एक वेगळ चित्र पहायला मिळू शकतं... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.