वर्धा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत वर्धा विधानसभा मतदारसंघात कसा प्रचार सुरू आहे? कोणाचे वर्चस्व आहे, यासंदर्भातला ग्राऊंड रिपोर्ट.
वर्धा विधानसभा मतदारसंघात एकेकाळी असणांर काँग्रेसचं वर्चस्व आता अंतर्गत गटबाजीमुळे लयाला चाललय असं चित्र निर्माण झालंय. 2009 मध्ये पराभूत झालेल्या शेखर शेंडेना पुन्हा काँग्रेसने संधी दिलीय. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे जनतेची पसंती आपल्यालाच असेल असा विश्वास शेखर शेंडेंना वाटतोय
तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश देशमुख यांनीही जनता पुन्हा आपल्यालाच पसंती देईल असा विश्वास व्यक्त केलाय. देशमुख विजयाचे दावे करत असले तरी वर्धा मध्यवर्ती बँक घोटाळा आणि शेतकरी, सामान्य जनतेची नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो.
युती तुटल्यामुळे शिवसेना आणि भाजपही आमनेसामने आहेत. शिवसेनेकडून रिंगणात असलेल्या रवीकांत बालपांडेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जनता शिवसेनेच्या पारड्यात मत टाकेल असं वाटतंय. भाजपमध्ये मात्र दत्ता मेघेंचे निकटवर्तीय पंकज भोयर निवडणूक लढवतायतत. मात्र उमेदवारीवरून भाजपमध्येच अंतर्गत कलह आहे
यंदा पक्षाला पाहून नाही तर उमेदवाराला पाहून मतदान होणार हे लक्षात घेत सर्वच पक्षाचे उमेदवार मतदारराजाला खूष करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जनता कुणाच्या पाठिशी राहणार हे आता पाहावं लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.