akhilesh yadav

अखिलेश भरकटला असून मतभेद लवकर मिटवले जातील - मुलायम यादव

समाजवादी पार्टीत यादवी सुरूच आहे. समाजवादी पार्टीचं सायकल निवडणुक चिन्ह कुणाचं याचा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. सायकल चिन्हावर दावा ठोकण्यासाठी मुलायम सिंह यादव यांची निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत शिवपाल यादव आणि अमरसिंह देखील होते.

Jan 9, 2017, 03:30 PM IST

मीच सपाचा अध्यक्ष, मुलायम सिंग यांनी अखिलेशला ठणकावलं

समाजवादी पार्टीतील यादवी संपता संपत नाहीए. समाजवादी पार्टीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष तर अखिलेश सिंह यादव फक्त मुख्यमंत्री असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी सांगितलं.

Jan 8, 2017, 07:55 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये घमासान, अखिलेशना 74 जिल्ह्यातून पाठिंबा

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि त्यांचा मुलगा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातली दरी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. अखिलेश आणि मुलायम यांच्यात समेट घडवून आणण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचं आता स्पष्ट झाले आहे

Jan 7, 2017, 11:44 PM IST

समाजवादी पक्षातल्या यादवीच्या समेटीचा प्रयत्न फसला

मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांच्यातील समेट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे

Jan 7, 2017, 05:30 PM IST

मुलायम - अखिलेश यादव यांच्यातील समेटाचा प्रयत्न अयशस्वी

 समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील समेट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अखिलेश आणि मुलायमसिंग वेगळी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत.

Jan 7, 2017, 04:14 PM IST

अखिलेश कुमार यांच्या समर्थनात 220 आमदारांनी केल्या स्वाक्षऱ्या

समाजवादी पक्षात सध्या पक्ष चिन्हावरुन वाद सुरु आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवून कोणाला किती समर्थन आहे याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

Jan 5, 2017, 03:32 PM IST

'सायकल'साठी पिता-पुत्राचा संघर्ष!

समाजवादी पार्टीतला राजकीय यादवी टोकाला गेलाय. पक्षाच्या सायकल या अधिकृत चिन्हासाठी पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष चिघळलाय.

Jan 3, 2017, 09:31 AM IST

लखनऊची यादवी आता दिल्ली दरबारी

समाजवादी पार्टीतला राजकीय संघर्ष आज टोकाला गेलाय. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आज सकाळीच दिल्लीत धाव घेतलीय. तर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घरी लखनऊत समर्थक आमदारांची बैठक सुरू झालीय. 

Jan 2, 2017, 11:09 AM IST

सपामधून रामगोपाल यादव पुन्हा निलंबित

 सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. पुन्हा सहा वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे. लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Jan 1, 2017, 04:34 PM IST

अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्ताव

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमधील यादवीचा फायनल राऊंड सुरु झाला आहे. अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठेवण्यात आला आहे. लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्क इथं हे अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.

Jan 1, 2017, 04:25 PM IST