सपामधून रामगोपाल यादव पुन्हा निलंबित

 सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. पुन्हा सहा वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे. लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 1, 2017, 04:34 PM IST
सपामधून रामगोपाल यादव पुन्हा निलंबित  title=

लखनऊ : सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. पुन्हा सहा वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे. लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

रामगोपाल यादव यांना सपामधून तिस-यांदा निलंबित करण्यात आलं आहे. लखनऊमध्ये रामगोपाल यादव यांनी बोलावलेले अधिवेशन आणि अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले प्रस्ताव असंवैधानिक असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी म्हटलंय. सपाचे 5 जानेवारीला लखनऊमध्ये जनेश्वर मिश्रा पार्क इथं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 393 उमेदवारांची जाहीर केलेली यादीही अंतिम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. काही लोक सीबीआयपासून वाचण्यासाठी आपल्याला बदनाम करत असल्याचे मुलायम यांनी म्हटलं आहे.