ajinkya rahane

सातव्या स्थानासाठी रहाणे आणि पांडे यांच्यात चुरस

ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. अवघ्या काही दिवसांवर टी-२० वर्ल्डकप येऊन ठेवलाय. त्यापूर्वीचा भारताचा हा विजय संघाचे मनोबल वाढवण्यास नक्कीच कामी येईल. टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Feb 4, 2016, 01:08 PM IST

कोटला टेस्टमध्ये विक्रम करणाऱ्या रहाणेची मराठीत मुलाखत

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणेंनं फिरोज शहा कोटलावर झालेल्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी लगावली.

Feb 1, 2016, 04:54 PM IST

प्रणव देखील एकेदिवशी आमच्या सोबत खेळेल - अजिंक्य

प्रणवला सचिन तेंडुलकर पाठोपाठ हरभजन सिंग, अजिंक्य रहाणे आणि भारताच्या वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शाब्बासकी दिली आहे. 

Jan 5, 2016, 09:16 PM IST

आयपीएल ९ : धोनी जाणार कोणत्या संघात... पुणे की राजकोट

 चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल या निलंबित टीम्समधील प्लेअर्सना निवडण्याची पहिली संधी पुण्याच्या टीमला मिळाली आहे. 

Dec 10, 2015, 05:33 PM IST

आयपीएल ९ : हे दहा दिग्गज क्रिकेटर ज्यांचा १५ डिसेंबरला होणार लिलाव

 इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आता दोन नव्या संघांना स्थान मिळाले आहे. पुणे आणि राजकोट हे दोन संघ पुढील दोन वर्षांसाठी जोडले जाणार आहे. आता क्रिकेट चाहते १५ डिसेंबरपर्यंत श्वास रोखून बसणार आहेत. या दिवशी दोन्ही संघ आपले खेळाडू निवडणार आहेत. 

Dec 10, 2015, 05:08 PM IST

विराट कोहलीला मागे टाकून अजिंक्य रहाणे अव्वल

 भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे भारताचा सर्वोच्च रँकिंग मिळविणारा टेस्ट फलंदाज झाला आहे. त्याने १४ स्थानांची उडी मारली आहे. आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये तो १२ व्या स्थानावर पोहचला आहे. त्याची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 

Dec 9, 2015, 06:50 PM IST

भारताचा ऐतिहासिक मालिका विजय, आफ्रिकेला ३-० ने दिला व्हाईटवॉश

अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला

Dec 7, 2015, 09:43 AM IST

जे सचिनला नाही जमलं ते या क्रिकेटरने करून दाखवलं

दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या दिल्ली टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे याने दोन्ही इनिंगमध्ये शानदार शतक ठोकलं. जे सचिन तेंडुलकरलाही नाही जमलं ते अजिंक्य रहाणे याने करून दाखवलं.

Dec 6, 2015, 08:59 PM IST

SCORE : चौथ्या दिवसअखेर आफ्रिका दोन बाद ७२

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आणखी ४०९ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून आफ्रिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्यात. हाशिम अमला २३ आणि एबी डेविलियर्स ११ धावांवर नाबाद आहेत.

Dec 6, 2015, 09:48 AM IST

एका smsने बदलले रहाणेचे करिअर

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. दिल्लीमध्ये सुर असलेल्या कसोटीत पहिल्या डावात रहाणेने कसोटी कारकिर्दीतील पाचवे आणि घरच्या मैदानावर पहिले शतक लगावले. पहिल्या २२ टेस्टमध्ये पाच शतक ठोकण्याची किमया फार कमी क्रिकेटपटूंनी केलीय. यात अजिंक्यच्या नावाचाही आता समावेश झालाय. मात्र हे शक्य झाले सचिनच्या एका एसएमएसने. या एसएमएसने रहाणेचे करिअर बदलून टाकले. 

Dec 5, 2015, 12:33 PM IST

SCORE : दक्षिण आफ्रिकेचा १२१ धावांत खुर्दा

रवीद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यासमोर भारताविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी द. आफ्रिकेचा पहिला डाव १२१ धावांत संपुष्टात आला. रविंद्र जडेजाने सर्वाधिक पाच बळी मिळवताना आफ्रिकेचा डाव झटपट गुंडाळण्यात मोलाचे योगदान दिले. त्याला उमेश यादव आणि आर. अश्विन (प्रत्येकी दोन) यांनी त्याला चांगली साथ दिली. 

Dec 4, 2015, 09:43 AM IST

अश्विने केला आज आणखी एक रेकॉर्ड

 अश्विन एका वर्षात सहा इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. 

Nov 27, 2015, 03:49 PM IST

आर. अश्विनचा अनोखा विक्रम

 एका दिवसात २० विकेट पडल्यावर विक्रम नाही होणार असे होऊ शकत नाही. असा एक विक्रम आर. अश्विन याने केला आहे. अश्विन एका वर्षात पाच विकेट पाच वेळा घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. 

Nov 26, 2015, 10:38 PM IST

अजिंक्य रहाणे दिसणार भावजींच्या 'होम मिनिस्टर'मध्ये

अजिंक्य राहणेने उखाणा घेतलेलं तुम्ही ऐकलं आहे का... नाही तर तुम्हांलाही ही संधी येत्या २२ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. 

Oct 19, 2015, 01:17 PM IST

विराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला!

भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि उप-कॅप्टन विराट कोहली यांच्यात काहीसा बेबनाव सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्यात. या चर्चांना आता आणखी हवा मिळणार आहे. कारण आहे धोनीनं घेतलेला एक नवा निर्णय... 

Oct 16, 2015, 06:55 PM IST