जे सचिनला नाही जमलं ते या क्रिकेटरने करून दाखवलं

दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या दिल्ली टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे याने दोन्ही इनिंगमध्ये शानदार शतक ठोकलं. जे सचिन तेंडुलकरलाही नाही जमलं ते अजिंक्य रहाणे याने करून दाखवलं.

Updated: Dec 6, 2015, 08:59 PM IST
जे सचिनला नाही जमलं ते या क्रिकेटरने करून दाखवलं title=

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या दिल्ली टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे याने दोन्ही इनिंगमध्ये शानदार शतक ठोकलं. जे सचिन तेंडुलकरलाही नाही जमलं ते अजिंक्य रहाणे याने करून दाखवलं.

पहिल्या इनिंगमध्ये रहाणेने १२७ तर दुसऱ्या इनिंगमध्ये शानदार शतक ठोकलं. टेस्टमध्ये ६ वं शतक ठोकणाऱ्या रहाणेनं भारताच्या एलीट क्रिकेट खेळाडुंच्या यादीमध्ये आपलं नाव कोरलं आहे. 

रहाणेच्या आधी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड़ आणि विराट कोहली यांनी हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. शनिवारी जपून खेळणाऱ्या रहाणेनं रविवारी खूपच चांगला खेळ करत अवघ्या ५४ बॉलमध्ये ४८ रन्स केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.