आर. अश्विनचा अनोखा विक्रम

 एका दिवसात २० विकेट पडल्यावर विक्रम नाही होणार असे होऊ शकत नाही. असा एक विक्रम आर. अश्विन याने केला आहे. अश्विन एका वर्षात पाच विकेट पाच वेळा घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. 

Updated: Nov 26, 2015, 10:38 PM IST
आर. अश्विनचा अनोखा विक्रम  title=

नागपूर :  एका दिवसात २० विकेट पडल्यावर विक्रम नाही होणार असे होऊ शकत नाही. असा एक विक्रम आर. अश्विन याने केला आहे. अश्विन एका वर्षात पाच विकेट पाच वेळा घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. 

एका कॅलेंडर वर्षात पाच वेळा पाच विकेट घेण्याची किमया अश्विनने करून दाखवली आहे. त्याने कपिल देवशी बरोबरी केली आहे. कपिलने अशी कामगिरी दोन वेळा केली आहे., हरभजन सिंग यानेही दोन वेळा केली आहे. सुभाष गुप्ते, बिशनसिंह बेदी, विनू मंकड आणि अनिल कुंबळे यांनी अशी कामगिरी केली आहे. 

या सात भारतीय गोलंदाजींनी अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी २००४ मध्ये अनिल कुंबळे याने अशी कामगिरी केली होती. 
 
अश्विनने ३२ धावा देऊन ५ विकेट घेतल्या आहे. यापूर्वी त्याने मोहालीत ५१ रन देऊन पाच विकेट घेतल्या होत्या. अश्विनने १४ वेळा पाच विकेट घेतल्या आहे. ही कामगिरी त्याने भारतातील १८ टेस्टमध्ये केली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.