aam aadmi party

... तर सुंदर स्त्रिया रात्री रस्त्यानं फिरू शकतील - सोमनाथ भारती

दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. देशाच्या राजधानीत पोलीस खातं 'आप' सरकारकडे असेल तर सुंदर स्त्रिया मध्यरात्रीही रस्त्यावर फिरू शकतील, असं विधान सोमनाथ भारतींनी केलंय. 

Aug 4, 2015, 10:37 AM IST

'आप' आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात, ५ वर्षांपासून पत्नीचा छळ

आम आदमी पक्षांच्या नेत्यासमोरचे संकटं काही कमी होत नाहीयेत. तोमर यांच्या अटकेनंतर आता आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारती चार वर्षांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी केलाय.

Jun 10, 2015, 08:54 PM IST

दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सकाळी १० वाजता त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आपच्या नेत्यांनी थयथयाट सुरू केलाय. दिल्लीतली राजकीय स्पर्धा त्यामुळं अधिक तीव्र झालीय. 

Jun 9, 2015, 09:32 PM IST

'आप' रॅलीत आत्महत्याचा प्रयत्न, त्या शेतकऱ्याचे निधन

 केंद्रातील भाजप सरकारच्या वादग्रस्त भूमी अधिग्रहन विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाने (आप) आज काढलेल्या मोर्चा दरम्यान एक शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.

Apr 22, 2015, 03:17 PM IST

'वॅगन आर'नंतर आता 'आप' समर्थकानं पक्षाचा लोगो मागितला

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासमोरचे संकटं काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. पक्षाच्या एका समर्थकानं अरविंद केजरीवाल यांना दिलेली वॅगन आर कार परत मागितल्यानंतर आता आता एका 'आप'चा लोगो परत मागितला. पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं लोगो वापस करण्याची मागणी केलीय.

Apr 8, 2015, 04:35 PM IST

सहकाऱ्यांनीच धोका दिला, केजरीवालांची यादव, भूषणवर आगपाखड

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली. आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला. 

Mar 29, 2015, 02:16 PM IST

यादव, भूषण यांची उचलबांगडी केजरीवालांमुळेच - मयांक गांधी

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपकडून केला जात असतानाच आता मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे आपमधील संघर्ष चव्हाट्यावर आणलाय. 

Mar 5, 2015, 05:14 PM IST

अरविंद केजरीवाल यांचा 'आप'च्या संयोजक पदाचा राजीनामा

आम आदमी पक्षामध्ये उलथापालथ सुरू आहे. पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या संयोजकपदाचा राजीनामा दिलाय. केजरीवाल यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हना पत्र लिहलंय. राजीनाम्यावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होईल. 

Mar 4, 2015, 01:22 PM IST

केजरीवाल हे लोकपालपेक्षाही मोठे झालेत का? 'आप'मध्ये तू तू मैं मैं

आम आदमी पार्टीत सध्या जोरदार साठमारी सुरू झालीय. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर अनेक वरिष्ठ नेते नाराज असून, आपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्यात.

Mar 2, 2015, 07:34 PM IST

केजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रीपदी?

आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर 'आप'नेते अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर निश्चित आहे. ते १४ फेब्रुवारीला पदाची शपथ घेतील. तर नव्याने दिल्लीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पद असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2015, 03:57 PM IST

दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!

आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय. 

Feb 12, 2015, 03:47 PM IST

दिल्लीत आपनं केला काँग्रेसचा सुपडा-साफ

15 वर्ष ज्या दिल्लीवर अधिराज्य केलं त्याच दिल्लीत एकही जागा जिंकता येवू नये, अशी नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवलीय. 

Feb 10, 2015, 04:30 PM IST

दिल्लीतील प्रचार थंडावला, भाजपच्या जाहिरातीवरुन वादळ

दिल्लीतला प्रचार गुरुवारी संध्याकाळी शमल्यानंतर आज वर्तमानपत्रात भाजपनं जाहिराती प्रसिद्ध केल्यात. यामध्ये केंद्र सरकारच्या ८ महिन्यांच्या कारकीर्दीची वाहवा करण्यात आलीये. या जाहिरातींवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं जोरदार आक्षेप घेतलाय. 

Feb 6, 2015, 06:11 PM IST