केजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रीपदी?

आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर 'आप'नेते अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर निश्चित आहे. ते १४ फेब्रुवारीला पदाची शपथ घेतील. तर नव्याने दिल्लीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पद असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 12, 2015, 03:57 PM IST
केजरीवाल यांचे विश्वासू मनीष  सिसोदिया उपमुख्यमंत्रीपदी? title=

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर 'आप'नेते अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर निश्चित आहे. ते १४ फेब्रुवारीला पदाची शपथ घेतील. तर नव्याने दिल्लीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पद असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

'आप'ने दिल्लीत ७० पैकी ६७ जागा जिंकल्या आहेत. स्पष्ट वन थर्डपेक्षा जास्त बहुमत असल्याने सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झालाय. १४ फेब्रुवारीला शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात अरविंद केजरीवाल यांच्यासह कॅबिनेट मंत्री म्हणून मनीष सिसोदीया, सत्येंद्र जैन, आदर्श शास्त्री, सौरभ भारद्वाज, जितेंद्र तोमर, कपिल मिश्रा, संदीप कुमार आणि असीम अहमद खान यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

तर राम विलास गोयल यांची सभापतीपदी निवड निश्चित मानण्यात येत आहे. गेल्या वेळी मंत्रिमंडळात असलेले वादग्रस्त मंत्री सोमनाथ भारती आणि राखी बिर्ला यांना यंदा मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.