अरविंद केजरीवाल यांचा 'आप'च्या संयोजक पदाचा राजीनामा

आम आदमी पक्षामध्ये उलथापालथ सुरू आहे. पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या संयोजकपदाचा राजीनामा दिलाय. केजरीवाल यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हना पत्र लिहलंय. राजीनाम्यावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होईल. 

Updated: Mar 4, 2015, 01:22 PM IST
अरविंद केजरीवाल यांचा 'आप'च्या संयोजक पदाचा राजीनामा   title=

नवी दिल्ली: आम आदमी पक्षामध्ये उलथापालथ सुरू आहे. पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या संयोजकपदाचा राजीनामा दिलाय. केजरीवाल यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हना पत्र लिहलंय. राजीनाम्यावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होईल. 

केजरीवालनं पत्रात म्हटलंय की, एकत्र दोन पदं सांभाळणं कठीण आहे. आता मी फक्त दिल्लीकडे लक्ष देऊ इच्छितो. मी दिल्लीतील कामात व्यस्त असल्यामुळे संयोजक पदाचा राजीनामा देतोय. आज आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होतेय. आज संध्याकाळी केजरीवाल बंगळुरूला जाणार आहेत तिथं ते १० दिवस आपल्या तब्येतीवर उपचार घेणार आहेत.

आम आदमी पक्ष (आप)मध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह समोर आल्यानंतर आता राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात येण्याचीही शक्यता आहे. आज दुपारी २ वाजता पक्षाची बैठक सुरू होणार आहे. तर दुसरीकडे आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी पक्षात कोणताही गृहकलह सुरू नाही

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.