दिल्लीत आपनं केला काँग्रेसचा सुपडा-साफ

15 वर्ष ज्या दिल्लीवर अधिराज्य केलं त्याच दिल्लीत एकही जागा जिंकता येवू नये, अशी नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवलीय. 

Updated: Feb 10, 2015, 04:30 PM IST
दिल्लीत आपनं केला काँग्रेसचा सुपडा-साफ   title=

नवी दिल्ली: 15 वर्ष ज्या दिल्लीवर अधिराज्य केलं त्याच दिल्लीत एकही जागा जिंकता येवू नये, अशी नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवलीय. 

दिल्लीत सत्तेवर असलेल्या काँग्रेसला 2015च्या विधानसभा निवडणुकीत एकाही जागेवर विजयी मिळवता आलेला नाही. काँग्रेसच्या दृष्टीनं ही अत्यंत निराशाजनक बाब असून या पराभवानंतर 'प्रियंका गांधींना आणा, काँग्रेसला वाचवा' अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. 

दिल्लीत शीला दिक्षीत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सत्तेवर होता. तब्बल 15 वर्ष दिल्लीचे तख्त काँग्रेसकडेच होतं. मात्र 2013 विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने काँग्रेसच्या नाकी नऊ आणले. 2013च्या विधानसभा निवडणुकीत  काँग्रेस 8 जागांसह थेट तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. 

तर आम आदमी पक्षानं 28 जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली उतरला होता. काँग्रेस पक्षनेतृत्वानंही दिल्लीत प्रचारसभा घेतल्या असल्या तरी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. याचे पडसाद निवडणुकीतही दिसून आले आहे. यंदाच्या निवडणूकीत काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही.

दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.