2611

भारताची सुरक्षाव्यवस्था सदोष- कविता करकरे

आपल्या देशाची सुरक्षाव्यवस्था सदोष असून दहशतवादी हल्ल्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झाली नसल्याचं मत शहिद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी व्यक्त केलंय.

Nov 26, 2011, 02:14 PM IST

सागरी सुरक्षा तपासणी, झी २४ तासच्या डोळ्यांनी

संपूर्ण मुंबईला हादरवणाऱ्या या विध्वंसक दहशतवादी हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणं राज्यातल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा खरोखरच वाढवण्यात आली का हे तपासून बघण्यासाठी झी चोवीस तासचे पाच प्रमुख प्रतिनिधी पाच महत्त्वाच्या सागरी किनाऱ्यावर जाऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निघाले.

Nov 26, 2011, 02:11 PM IST

मुंबई अजूनही असुरक्षितच!

२६/११ च्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनीच याची कबुली दिली आहे. मुंबईच्या सागरी सीमा पूर्णःत सुरक्षित नसल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त आरुप पटनाईक यांनी म्हटलंय.

Nov 26, 2011, 08:10 AM IST

२६/११ला पोलिसांची 'नवी दृष्टी'

२६/११ च्या निमित्तानं पुणे पोलिसांनी मरणोत्तर नेत्रदानाचा कौतुकास्पद संकल्प केलाय. पुण्यातल्या दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या १२६ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी हा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी फॉर्म्सही भरुन दिलेत.

Nov 26, 2011, 07:41 AM IST

'कसाब'वर खर्च 'बेहिसाब' !

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्याजेलमधील सुरक्षा, औषध आणि खाण्यावर आतापर्यंत १६ कोटी ५० लाख रूपये खर्च झाला आहे. कसाब आर्थर जेलमध्ये असून त्याचा खर्च केंद्र सरकारनं करावा, अशी विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली होती परंतु केंद्राकडून याबाबत अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

Nov 22, 2011, 01:53 PM IST