2014 commonwealth games

भारतीय हॉकी संघ फायनलमध्ये!

ग्लास्गोः 20व्या राष्ट्रकुल स्पर्धेत हॅाकीच्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघानं शनिवारी झालेल्या न्यूझिलंड विरूद्ध सामन्यात विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारलीय. भारताकडून आकाशदीप सिंग, रमनदीप सिंग आणि पाल सिंगने गोल करत हा विजय खेचून आणला.

Aug 2, 2014, 08:47 PM IST

कॉमनवेल्थ 2014: भारताची 51 पदकांची कमाई

ऑलंपिक कास्य पदक विजेत्या विजेंदर सिंगसह कॉमनवेल्थ गेम्समध्ये चार भारतीय बॅाक्सर खेळाडूंनी शुक्रवारी फायनलमध्ये प्रवेश  केला. तर महिला थाळीफेकपटू सीमा पूनिया आणि टेबल टेनिस पुरुष दुहेरीत अचंता शरत कमल, अँथनी अमलराज या जोडीने रौप्यपदक जिंकलं. स्क्वॅाशमध्ये दीपिका पल्लिकल आणि जोसना चिनप्पा याजोडीने महिला दुहेरीत फाइनलमध्ये पोहचत रौप्यपदक पक्क केलयं.

Aug 2, 2014, 02:24 PM IST

कॉमनवेल्थ : भारताच्या 'चक दे' गर्ल्सचा ढासू विजय

'ग्लासगो कॉमनवेल्थ 2014' मध्ये सोमवारी भारताच्या महिला हॉकी टीमनं टोबॅगो टीमला धोबीपछाड दिली. या 'चक दे' गर्ल्सच्या पुढच्या वाटचालीसाठी भारतानंही त्यांना शुभेच्छा दिल्यात.  

Jul 29, 2014, 04:53 PM IST

गगन नारंगने पटकावले सिल्वर मेडल

ग्लासगो :  भारताचा स्टार शूटर गगन नारंग याने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सिल्वर मेडल पटाकावून भारताच्या मेडल संख्येत आणखी एक मेडल मिळवून दिले आहे.

गगन या मेडलमुळे भारताने आतापर्यंत २४ मेडल पटकावले आहेत. यात ७ गोल्ड, १० सिल्वर आणि ७ ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत. २४ मेडल सह भारत चौथ्या स्थानावर आहे. 

Jul 28, 2014, 07:27 PM IST

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशीच भारताचं मेडल पक्क

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशी भारताचं पहिलं मेडल निश्चित झालंय. ज्यूडोच्या 60 किलो वजनी गटात नवज्योत चानानं फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केलंय. त्यानं सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ले ग्रॅनेजवर वाझा अरी पद्धतीनं टफ बाऊटमध्ये मात केली. आता फायनलमध्येही बाजी मारून चाना भारताला पहिलं गोल्ड मेडल पटकावून देतो का? ते पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

Jul 24, 2014, 08:10 PM IST