ग्लास्गो: ऑलंपिक कास्य पदक विजेत्या विजेंदर सिंगसह कॉमनवेल्थ गेम्समध्ये चार भारतीय बॅाक्सर खेळाडूंनी शुक्रवारी फायनलमध्ये प्रवेश केला. तर महिला थाळीफेकपटू सीमा पूनिया आणि टेबल टेनिस पुरुष दुहेरीत अचंता शरत कमल, अँथनी अमलराज या जोडीने रौप्यपदक जिंकलं. स्क्वॅाशमध्ये दीपिका पल्लिकल आणि जोसना चिनप्पा याजोडीने महिला दुहेरीत फाइनलमध्ये पोहचत रौप्यपदक पक्क केलयं.
भारताने 51 पदकांची कमाई केली असून त्यात 13 सुवर्ण, 23 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत 51 पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंड 139 पदकांसह पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया (123), कॅनडा (74), आणि स्कॉटलंड (48) यांचा क्रमांक लागतो.
बॉक्सिंग पुरुष विभागात विजेंदर (75 किलो), एल देवेंद्रो (49 किलो) आणि मनजीत जांगड़ा (69 किलो) तर बॉक्सिंग महिला विभागात सरिता देवी (60) यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विजेंदरने त्याच्या अनुभव आणि ताकतीच्या बलावर आयरलॅंडच्या कोनोर कोएलेला चीत् केलं. उत्तर असे पराभूत केले. सर्व तीन पंचानी त्याला विजेता घोषीत केलं.
देवेंद्रोने वेल्सच्या अॅश्ले वेल्सला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता त्याचा सामना आयरलॅंडच्या पॅडी वर्न्सशी होईल. दूसरीकडे एक अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये मनजीतने उत्तर आयरलॅंडच्या स्टीव्हन डोनोलीला पराभूत केलं. आता त्याचा सामना इंग्लंडच्या स्कॉट फिट्जगार्डशी होईल.
पी वी सिंधूने न्यूजीलंडची एना रॅनकिनला 21-10 आणि 21-9 या गुणांसह मोठा विजय मिळवला तर परुपल्ली कश्यपने मलेशियाच्या डेरेन ल्यूला 21-13 आणि 21-14 ने मात देत उपांत्य फेरी गाठली.
भारताची महिला बॉक्सर पिंकी रानीचा 48 किलोग्राम वर्गात आयरलॅंडच्या मिशेला वाल्शशी झालेल्या सामन्यात पराभव झाल्याने कास्य पदकावर समाधान मानावं लागलं. हा 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं बॉक्सिंग इवेंट मधलं पहिलं पदक आहे.
टेबल टेनिसच्या पुरुष दुहेरी वर्गात भारताच्या अचंता शरत कमल आणि ए अर्पुथराज या जोड़ीने सिंगापुरच्या यॅंग आणि झान या जोड़ीला 11-7, 12-10, 11-3 ने हरवलं. ही भारतीय जोड़ी आता फाइनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे भारताचं एक पदक पक्कं झालं आहे. फाइनलमध्ये ही जोड़ी सिंगापुरच्या गाओ आणि ली या जोड़ीशी लढतील.
भारताच्या बॅडमिंटन खेळाडू पी वी सिंधूने महिला एकेरी वर्गात तर परुपल्ली कश्यप याने पुरुष एकेरी वर्गात विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.