कॉमनवेल्थ : भारताच्या 'चक दे' गर्ल्सचा ढासू विजय

'ग्लासगो कॉमनवेल्थ 2014' मध्ये सोमवारी भारताच्या महिला हॉकी टीमनं टोबॅगो टीमला धोबीपछाड दिली. या 'चक दे' गर्ल्सच्या पुढच्या वाटचालीसाठी भारतानंही त्यांना शुभेच्छा दिल्यात.  

Updated: Jul 29, 2014, 04:53 PM IST
कॉमनवेल्थ : भारताच्या 'चक दे' गर्ल्सचा ढासू विजय title=

ग्लासगो : 'ग्लासगो कॉमनवेल्थ 2014' मध्ये सोमवारी भारताच्या महिला हॉकी टीमनं टोबॅगो टीमला धोबीपछाड दिली. या 'चक दे' गर्ल्सच्या पुढच्या वाटचालीसाठी भारतानंही त्यांना शुभेच्छा दिल्यात.  

त्रिनिदादमध्ये पार पडलेल्या 'महिला हॉकी'मध्ये सोमवारी रात्री भारत विरूद्ध टोबॅगो असा सामना पाहायला मिळाला. हा सामना भारतानं 14-0 अशा फरकानं जिंकलाय. भारताने पहिल्या हाफमध्ये उत्तम प्रकारे 9 आणि दुसऱ्या हाफमध्ये 5 गोल करत मोठा विजय मिळवला.

भारताच्या दीपिका ठाकूर, राणी रामपाल आणि जसप्रित कौर यांनी 3-3 तर आणि अनूपा बार्ला, रितुषा आर्या, रितु रानी, अनुराधा थाकचोम आणि वंदना कटारियाने 1-1 गोल करत हा विजय अक्षरश: खेचून आणला. 

वंदना कटारियाने चौथ्या मिनिटाला, दीपिका ठाकूरने 11 व्या, 27 व्या आणि 64 व्या मिनिटाला, राणी रामपालने 12 व्या, 19 व्या व 25 व्या मिनिटाला, जसप्रित कौरने 18 व्या, 41 व्या आणि 48 व्या मिनिटाला, रितू राणीने 22 व्या मिनिटाला, अनुराधा थाकचोमने 31 व्या मिनिटाला, अनूपा बार्लाने 53 व्या मिनिटाला आणि रितुषा आर्याने 68 व्या मिनिटाला गोल नोंदविला.

भारतीय खेळाडूंनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या खेळाडूंना कोणतीही संधी न देता उत्तम खेळ करत जणू गोलांचा पाऊसच पाडला.

आता, येत्या 30 जुलै रोजी भारतीय महिला संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.