सचिन सूर्यवंशी

आमदार मारहाणीनंतर सूर्यवंशींची मुंबईबाहेर बदली

आमदार मारहाण प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. वरळी वाहतूक पोलीस शाखेतून सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली झाली.

Aug 9, 2013, 12:29 PM IST

पाच आमदारांचे निलंबन मागे

पोलीस सचिन सूर्यवंशी यांना पाच आमदारांनी मारहाण केली होती. मारहाण केलेल्या निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतल्याचे आज विधानसभेत करण्यात आली.

Jul 24, 2013, 12:59 PM IST

सूर्यवंशींचं निलंबन सूडापोटी! वाय पी सिंग यांचा आरोप

पीएसआय सचिन सूर्यवंशीवरील कारवाई सुडापोटी झाल्याची टीका माजी आयपीएस अधिकारी वाय पी. सिंह यांनी केली आहे. तसंच प्रामाणिक अधिका-यावर कारवाई कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

Mar 25, 2013, 07:22 PM IST

खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं!

राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेला नाही.

Mar 24, 2013, 07:08 PM IST

आमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा

विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Mar 20, 2013, 05:47 PM IST

आमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Mar 20, 2013, 04:52 PM IST

कुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !

एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.

Mar 20, 2013, 04:31 PM IST

पोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन

साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.

Mar 20, 2013, 03:21 PM IST

हे लोकप्रतिनिधी की गुंड, मी राजीनामा देणार - सूर्यवंशी

साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणारे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे की गुंड?

Mar 20, 2013, 12:49 PM IST

राम कदमांनी केली मारायला सुरुवात - सूर्यवंशी

प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.

Mar 20, 2013, 08:43 AM IST