सूर्यवंशींचं निलंबन सूडापोटी! वाय पी सिंग यांचा आरोप

पीएसआय सचिन सूर्यवंशीवरील कारवाई सुडापोटी झाल्याची टीका माजी आयपीएस अधिकारी वाय पी. सिंह यांनी केली आहे. तसंच प्रामाणिक अधिका-यावर कारवाई कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 25, 2013, 07:22 PM IST

www.24taas.com, मुंबई
पीएसआय सचिन सूर्यवंशीवरील कारवाई सुडापोटी झाल्याची टीका माजी आयपीएस अधिकारी वाय पी. सिंह यांनी केली आहे. तसंच प्रामाणिक अधिका-यावर कारवाई कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
याप्रकरणी पोलीस महासंचालकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही वाय पी. सिंह यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे.

आमदारांना निलंबित केल्यानंतर पीएसआय सूर्यवंशी यालाही निलंबित करावे, अशी मागणी आमदारांनी विधानसभेत केली होती. या दबावाला बळी पडत हे निलंबन करण्यात आल्याची चर्चा विधानसभा परिसरात होती.