कुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !

एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 20, 2013, 04:39 PM IST

www.24taas.com, मुंबई
एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.
पोलिसांनी आता संबंधित आमदारांच्या अटकेसाठी तयारी करायला सुरूवात केली आहे. सचिन सूर्यवंशींनी आपल्या वक्तव्यात मनसेचे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नावांचा उल्लेख केला. त्यामुळे या दोन आमदारांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र या आमदारांना अटकपूर्व जामीनही मिळू शकतो.

आमदार त्यांना होणाऱ्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांच्याशिवाय इतर कोण आमदार मारहाण करत होते, हे राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांच्या चौकशीतून पुढे येईल.